![]() |
- सोनोरी गावकरयानी दिले पकडूंन
- माना पोलिसांची कारवाई
शफ़ी खान.
कुरुम :- माना पो.स्टे. अंतर्गत येत असलेल्या सोनोरी शिवारात कास्तकारांच्या शेतातून इलेक्ट्रिक केबल चोरी करुण प्लास्टिक च्या कटयात भरून मोटर सायकलवर बांधून नेत असलेल्या एका चोरास रंगे हात पकडून सोनोरी गांव करयांनी माना पोलिसांच्या ताब्यात दिल्याची घटना आज दुपारी घडली.
माना पोलिसांच्या प्राप्त माहिती अनुसार सदर गुह्यतिल आरोपी करण बबन पावर वय 20 वर्ष रा.दारापुर पो.स्टे. खोलापुर ता.दर्यापुर जि.अमरावती हा सोनोरी शेत शिवरातिल शेतातून इलेक्ट्रिक मोटर पम्पाचे केबल चोरुंन पंढरया कट्टयात मोटर सायकल वर बांधून नेत होता. तेव्हा त्याची गांवा जवळ मोटर सायकल स्लिप झआली.त्या वेळेस गावातील काही लोक त्याला मदत करावयास गेले असता त्याची विचारपूस केली व पोत्यात पहिले असता त्यात शेतातील पाइप ,इलेक्ट्रिक केबल चोरुंन आनले असे दिसून आले व अशी माहिती गांवकरयानी माना पो.स्टे चे ठानेदार भाऊराव घुगे यांना दिली. व लगेच साहेबांनी पोलिस स्टाफ पाठवून सदर इस मास ताब्यात घेऊन पो.स्टे. ला आणून अटक करून कलम 189 भा.द.वी. दाखल करण्यात आले.सदर आरोपीवर आणखी पो.स्टे. ला गुन्हे दाखल असून त्याच्या पासून इतरही गुह्यतिल चोरलेला माल मिळू शकतो.करिता सदर आरोपिचा तीन दिवसाचा पी सी आर घेतला आहे.
सदर गुह्यात पो.उप.नि. चंदू पाटिल,ए.एस. आय.प्रदीप उमक,ना.पो.को. चंद्रशेखर गोर,पो.कॉ. वैभव येळने यांनी आरोपी पकडन्यात मदत केली. तसेच सदर गुह्याचा तापस मा.ठानेदार बी.पी.घुगे यांच्या मार्गदर्शनात पो.हे. कॉ.तुकाराम राउत व ना.पो.कॉ. प्रभाकर नागे कारित आहे.
