प्रसथापित पुढाऱ्यांनी आमच्या पोरांचा वापर करुन घेतला,आता हे चालणार नाही— संभाजी ब्रिगेड तालुका अध्यक्ष सुनिल साळुंके



इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- प्रस्थापित राजकीय पुढाऱ्यांनी आमच्या पोरांचा वापर करून घेतला,आता बस झेंडा आणि दांडा आमचाच,शेतकऱ्यांच्या पर्यायी पक्ष म्हणजे संभाजी ब्रिगेड आहे.गाव तिथे शाखा व घर तिथे कार्यकर्ता हा उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवुन गाव तिथे शाखा संभाजी ब्रिगेड काढीत आहे.या शाखेच्या माध्यमातुन महिला व विद्यार्थ्यांच्या विविध अडचणी सोडवण्यात येणार आहेत.असे प्रतिपादन संभाजी ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष सुनिल साळुंके यांनी केले.


लोहारा तालुक्यातील हराळी,धानोरी,हिप्परगा(सय्यद), जेवळी,मोगा,बेलवडी,बेंडकाळ,उंडरगाव या गावात संभाजी ब्रिगेडच्या शाखा उदघाटन सोहळा पार पडला.या प्रसंगी तालुका अध्यक्ष सुनिल साळुंके बोलत होते.या संभाजी ब्रिगेडच्या शाखा उदघाटन सोहळ्यास या गावातुन प्रचंड प्रतीसाद मिळाला.

यावेळी विट्ठल सुर्यवंशी,सुरज साळुंके,दादा पाटील, धनराज बिराजदार,गोपाळ माने,शिवाजी जाधव, सुरज सूर्यवंशी,अरुण सूर्यवंशी,श्रीहरि रसाळ, साहेबराव साळुंके,यांच्यासह नवनिर्वाचित पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post