पूर्णा(प्रति)- तालुक्यातील माटेगाव येथील एका विवाहीत महिलेस अश्लील फोटो काढून गावातील नाराधमाने बदनामीची व मुलास मारून टाकण्याची धमकी देत सतत बलात्कार केल्याची तक्रार पीडित महिलेने दिली. यावरून पूर्णा पोलिसांनी पोलिस पाटलांसह अन्य दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पूर्णा तालुक्यातील मौजे माटेगाव येथील एका विवाहित महिलेला आरोपी अमोल ज्ञानदेव बोबडे याने दि. १८/३/२०१८ ते दि. २/४/२०१८ प्रयंत बळजबरीने हात धरून शेतात नेऊन अश्लील फोटो काढून जर तू या बाबत आरडाओरडा केल्यास तुझे अश्लील फोटो तुझ्या नवऱ्यास व लोकांना दाखवून तुला सर्वत्र बदनाम करून तुझ्या लेकराल जिवे मारण्याची धमकी देत बळजबरीने बलात्कार केला. त्या नंतर तिचे अश्लील फोटो काढून त्या नंतर तिला त्या फोटो ची वारंवार धमकी देत होता आणि तिच्या सोबत वारंवार शारीरिक अत्याचार करून तिच्यावर बलात्कार करत होता. या सर्व त्रासाला कंटाळून सासरी व आपल्या पतीला माहीत होऊ नये व आपल्या संसारात काही बाधा होऊ नये, या भीतीने नाईलाजाने महिलेने सर्व त्रास सहन केला. त्या नंतर आरोपी अमोल बोबडे यानी तिला आळंदी पुणे येथे नेऊन सतत बलात्कार करून रंगनाथ बोबडे याना बोलावून सदर महिलेस त्याच्या सोबत जाण्यास भाग पाडले तेव्हा रंगनाथ बोबडे यांनी या पीडित महिलेच्या अंगावरील सोन्याच्या ४ ग्रामचे पोत व ८ ग्रामचे झुंबर असे एकूण ३१ हजार रुपयेचे दागदागिने काढून घेत शिर्डी येते नेऊन नंतर पूर्णा येथे आणून पोलिस पाटील भीमाशंकर स्वामी सोबत घेऊन सदर महिलेच्या मुलास जिवे मारण्याची धमकी देत तुझ्या नवऱ्याचा विरुधात पोलिसात तक्रार देण्यास सांगितले.सदर पीडित महिला घरची ना घाट ची राहिली नसल्याने त्याने थेट पूर्णा पोलिसात धाव घेतली व दि. ११/५/२०१८ रोजी रात्री ९.१३ वाजता पीडित महिलेची फिर्यादी वरून पूर्णा पोलीस ठाण्यात गुरन ६६/१८ कलम ३५४अ, ३७६(२)(n), ३६६, ३२७, ५०६, ३४ भादवी प्रमाणे आरोपी अमोल बोबडे, रंगनाथ बोबडे, भीमाशंकर स्वामी, या तीन नाराधमा वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो.नि. सुनिल ओव्हाळ स्वतः करीत आहे.
SHARE THIS
