जिल्हयातील एमआरईजीएस ची कामे ठप्प कामे सुरु न केल्यास रस्त्यावर उतरु- भावनाताई गवळी यांचा इशारा



मक़सूद अली 
प्रतिनिधी यवतमाळ :-जिल्हयातील अनेक भागात एमआरईजीएस ची कामे बंद असल्याने मजुरांवर उपासमारीची पाळी आली आहे.हाताला कामच नसल्याने अनेक मजुरांनी स्थानांतर सुध्दा केले आहे.दरम्यान ही कामे तातडीने सुरु न केल्यास रस्त्यावर उतरुन आंदोलन करु असा इशारा आज खासदार भावनाताई गवळी यांनी जिल्हा प्रशासनाला दिला. आज या आशयाचे निवेदन शिवसेनेच्या वतीने जिल्हाधिका-यांना देण्यात आले.

यवतमाळ जिल्हयात सध्या दुष्काळाची स्थिती आहे. ग्रामीन भागातील मजुरांच्या हाताला काम नाही. जिल्हयात मोठे उद्योग सुध्दा नसल्यामुळे मजुरांना नेहमीच रोजगाराचा प्रश्न उपस्थित होत असतो. अशा परीस्थितीत मजुरांना एमआरईजीएस च्या कामाचा चांगला आधार मिळू शकतो. मात्र  जिल्हयातील अनेक भागातून एमआरईजीएस ची कामे बंद झाली आहे . काही भागात कामे सुरु असली तरी ती  बोटावर मोजण्याईतकीच आहे. एमआरईजीएस


ची कामे मोठया प्रमाणात सुरु केल्यास जिल्हयातील मजुरांचा उदर निर्वाहाचा प्रश्न सोडविल्या जाऊ शकतो. बाभूळगाव, कळंब, राळेगाव सह अनेक तालुक्यातील मजुर आता कामासाठी दुस-या जिल्हयात जाण्याच्या तयारीत आहे. अशा परीस्थितीत त्यांच्या कुटूंबाची वाताहात झाल्याशिवाय राहणार नाही. दरम्यान या बाबत अनेक मजुरांच्या तक्रारी

खासदार भावनाताई गवळी यांना प्राप्त झाल्या. या तक्रारींची दखल घेत आज शिवसेनेच्या पदाधिका-यांनी भावनाताई गवळी यांच्या नेत्रृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. याठिकाणी निवासी उपजिल्हाधिकारी नरेंन्द्र फुलझेले साहेब यांना शिवसेनेच्या वतीने निवेदन देण्यात आले  याठिकाणी एमआरईजीएस च्या कामाच्या बाबतीत प्रशासन जाणीवपुर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे लक्षात आणून देण्यात आले. दहा दिवसात कामे सुरु न केल्यास रस्त्यावर उतरुन आंदोलन

करण्याचा इशारा देण्यात आला. या प्रसंगी शिवसेनेचे माजी आमदार बाळासाहेब मुनगिनवार, जिल्हाप्रमुख राजेन्द्र गायकवाड, जिल्हा महिला संघटक लताताई चंदेल, यवतमाळ विधानसभ संपर्क प्रमुख संतोष ढवळे, निवासी उपजिल्हा प्रमुख प्रविण पांडे, उपजिल्हाप्रमुख गजानन डोमाळे, किशोर इंगळे, अमोल धोपेकर, विनोद काकडे, दिगांबर मस्के,संजय रंगे, पिंटु बांगर, पंस सभापती एकनाथ तुमकर,  उपसभापती गजानन पाटील, पंस सदस्य नंदाताई कडके, वसंत जाधव, राकेश राऊळकर, विजय पाटील,

प्रदीप चिव्हाणे, अमीत राडे, इंदल राठोड, गणेश वरडे,  राजु धोटे, चंदन नित, रमेश धोटे, शशीकांत खोडके, दिनेश हसतबांधे, निलेश मेत्रे, नाना धानफुले,संजय डफळे, दयानंद बिरके, राहुल खाडे, गणेश आगरे, प्रविण लांजेवार उपस्थित होते.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post