वकीलांनी पक्षकारांची चांगली मांडणी केली तर निकाल चांगले लागतील— उच्च न्यायालय मुंबई खंडपिठ औरंगाबाद न्यायमुर्ती व्ही.के.जाधव



इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- वकीलांनी पक्षकारांची बाजु आरगुमेंट चांगली मांडणी केली तर निकालही चांगले लागतील यासाठी वकील मंडळीनी अभ्यास करणे गरजेचे आहे,असे प्रतिपादन उच्च न्यायालय,मुंबई खंडपीठ औरंगाबाद तथा पालक न्यायमुर्ती उस्मानाबाद व्हि.के.जाधव यांनी केले.लोहारा शहरात दिवाणी न्यायधीश(कनिष्ठ स्तर) व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग न्यायालयाच्या नविन इमारतीचे उदघाटन दि.6 मे रोजी करुन न्यायमुर्ती व्ही.के.जाधव बोलत होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा व सत्र न्यायधीश देवराम ना. आरगडे(उस्मानाबाद) होते.


तर व्यासपिठावर प्रमुख म्हणुन दिवाणी न्यायधिश कनिष्ठ स्तर अ.अ.शिंदे(लोहारा),तालुका विधीज्ञ मंडळ अध्यक्ष आर.बी.जाधव होते.यावेळी न्यायमुर्ती व्ही.के.जाधव पुढे बोलताना म्हणाले कि,लोहारा शहरात प्रशस्त अशी सुशोभित न्यायालयाची सुंदर इमारत झाली आहे.या इमारतीत सर्व सुविधा तयार करुन दिल्या आहेत.येथील वकील संघ फार छोटा असुन या वकिल संघाला लँबरी व कॉमप्युटरसाठी मदत जिल्हा वकील संघाने व बार कौन्सील व खा.प्रा.रविंद्र गायकवाड व आ.ज्ञानराज चौगुले यांनी  मदत करावी,असे सांगीतले.या कार्यक्रमाचे प्रस्ताविक तालुका विधीज्ञ मंडळ अध्यक्ष आर.बी.जाधव व सुत्रसंचालन अँड.


अतुल कुलकर्णी व अँड.संध्या तिगाडे यांनी केले तर आभार दिवाणी न्यायधीश कनिष्ठ स्तर अ.अ.शिंदे (लोहारा) यांनी मानले.या कार्यक्रमास खा.प्रा.रविंद्र गायकवाड,आ.ज्ञानराज चौगुले,नायब तहसीलदार रणजित शिराळकर,पो.नि.सर्जेराव भंडारे,नगराध्यक्षा पोर्णिमा जगदिश लांडगे,उपअभियंता पी.पी.आकोसकर,शंकर जट्टे,दिपक मुळे,नगरसेवक अङिमान खराडे,सरपंच मोहन पणुरे,नगरसेवक शाम नारायणकर,अँड.दादासाहेब पाटील,अँड.एस.व्ही. माशाळकर,अँड.अप्पु जट्टे,अँड.के.डी.मोरे,अँड.
मल्लीनाथ वचने पाटील,अँड.तोतला,अँड.कोंथिबरे,
अँड.बादुले,यांच्यासह शहरातीस व परिसरातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post