वाहतुकीच्या नियमाचे काटेकोर पालन करुन होणारा अपघात टाळा—उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रकांत खांडवी



इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- अलीकडे वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून त्या तुलनेत वाहतूकीचे नियम पाळले जात नाहीत.रस्ता सुरक्षेबरोबर आरोग्य सुरक्षाही महत्वाची असून स्वतः सोबत दुसऱ्या व्यक्तीचीही काळजी घेणे महत्वाचे आहे तेव्हा वाहतुकीच्या नियमाचे काटेकोर पालन करुन होणारा अपघात टाळा असे प्रतिपादन उमरगा उपविभागीय पोलिस अधिकारी चंद्रकांत खांडवी यांनी केले.उस्मानाबाद जिल्हा अंतर्गत रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत मुरुम पोलिस ठाण्याच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे उदघाटन दि.6 मे रोजी करुन ते बोलत होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुरुम नगराध्यक्षा अनिता अंबर होत्या. यावेळी प्रमुख म्हणुन महालॅब जिल्हा समन्वयक शिवरत्न चौरे, वाहतूक नियंत्रक अमरसिंह राजपुत, ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.कल्पना पाटील, माजी नगराध्यक्ष सुधीर अंबर,सहाय्यक पो.नि.मुस्तफा  शैख,उप पो.नि.ज्ञानदेव सानप, नगरसेवक अजित चौधरी,उल्हास घरघुरे आदि, उपस्थित होतै यावेळा.प्रारंभी मोफत आरोग्य शिबीराचे दिपप्रज्वलन व पोस्टर प्रदर्शनाचे फित कापून उदघाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. उपप्राचार्य सुधीर अंबर यांनी वाहन चालविताना मोबाईल वापरु नका,मद्यपान करुन वाहन चालवू नका,हेल्मेटचा वापर करा,वेगावर मर्यादा ठेवा असे वाहनचालकांना आवाहन केले.अंनिसचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रा.डॉ.महेश मोटे यांनीही यावेळी मार्गदर्शन केले.तुळशीराम देडे,दत्ता बोडरे,दयानंद साखरे, पोहेकॉ.नितीन गुंडाळे,बीट अंमलदार गोरखनाथ शिंदे,संदिपान कोळी,ज्ञानेश्वर गुरव,महेश अवचार,जी.पी.मुळे,एल.ए.घुगे,ए.टी.शेख,ए.व्ही.भोसले,प्रयोगशाळा परिचर ईलाई शेख,उमेश लोखंडे, सोयल खान, योगेश गायकवाड,अंकुश शेवाळकर, अंकुश पवार आदिंनी पुढाकार घेवून दोनशे नागरिकांची मोफत रक्त व लघवी तपासणी केली.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक स.पो.नि.मुस्तफा शेख व सूत्रसंचालन प्रा.सुभाष हुलपल्ले यांनी केले.तर आभार उप.पो.नि.ज्ञानदेव सानप यांनी मानले.या कार्यक्रमास परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post