चेतन पवार
उमरगा तालुका (प्रतिनिधी) उमरगा तालुक्यातील आलूर येथे बंजारा समाजाच्या वतीने संत सेवालाल महाराज आणि आई जगदंबा यात्रा मोठ्या उत्साहात पार पाडले.या यात्रेस १४ मे रोजी सुरवात झाली,यावर्षी पाहिल्यादाच सेवालाल महाराज यांची पालखी मिरवणूक ढोल ताश्याच्या गजरात ,पारंपरिक वेशभूश्यात महिला डोक्यावर जलकलश घेऊन गावातील श्री सोमेश्वर मंदिर ,श्री शांतेश्वर मंदिर आणि हनुमान मंदिरात श्रीफळ अर्पण करून गावातून मिरवणूंक काढण्यात आली.हि यात्रा गेल्या ३२वर्षयापासून चालू असून यात्रेस खूप मोठ्या संख्येने पंचक्रोशीतील बंजारा समाज उपस्थित होते.१५ मे रोजी आई जगदंबा यांची यात्रा साजरी करण्यात आली .यावेळी संत सेवालाल महाराज आणि आई जगदंबा मंदिरात विदूत रोषणाई करण्यात आली होती
.गावातील काही बंजारा समाजाचे बाहेर गावी असलेले अधिकारी,कर्माच्यारी आणि कामानिमित्त बाहेर गावी असलेले नागरिक यात्रे निमित्त आवर्जून उपस्थित होते.या यात्रेनिमित्त पारंपरिक भजन ,कीर्तन आणि भारुडाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.हि यात्रा यशस्वी करण्यासाठी मिथुन महादेव राठोड (मुंबई पोलिस) शिवाजी राठोड,बाबू राठोड ,व्यंकट राठोड,बन्सीलाल पवार,महादेव राठोड ,रमेश राठोड,शिवा राठोड,हरी राठोड,खुबा जाधव,सुधाकर पवार,निलु राठोड,कल्लू राठोड,पांडुरंग पुजारी,शंकर राठोड आदींनी परिश्रम घेतले.

