अनवर खान
मूर्तिजापूर तालुका :- श्री व्यंकटनाथ महाराज शिक्षण संस्था द्वारे संचालीत व्यंकटेश बालाजी इंग्लीश स्कूलमध्ये आध्यात्मिक शिबिराचे उद्घाटन करण्यात आले 21 दिवशीय आयोजित शिबीराचे
माता सरस्वती व श्री व्यंकटनाथ महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून सुरुवात करण्यात आली श्री व्यंकटनाथ महाराज यांच्या आशिर्वाद व्यंकटेश बालाजी इंग्लीश कॉन्व्हेंट मध्ये आध्यात्मिक बाल संस्कार शिबिराच्या माध्यमातून मुला व मुलींनी मध्ये धार्मिक संस्कार निर्माण व्हावे म्हणून संस्था चे संस्थापक अध्यक्ष प्रा ज्ञानेश्वर ढेरे यांच्या पुढाकाराने सदर शिबिराचे आयोजन केले सकाळी योगासन प्राणायाम सूर्यनमस्कार संस्कृत पाठ गायन वादन व्यक्तीमत्व विकास चर्चा हरिपाठ भारूड पावली आरती पसायदान शिकविण्यात येईल
ह भ प हरिदास महाजन इंगळे हभप दिपक महाराज कावळे ,हभप महेश महाजन राऊत इत्यादीकाचा मार्गदर्शन लाभणार आहे आध्यात्मिक बाल संस्कार शिबिराला यशस्वितेसाठी प्रा ज्ञानेश्वर ढेरे अजाबराव वहीले रविंद्र साबळे राऊत काका ज्ञानेश ताले विवेक कांबे योगेश भंडागे प्रा अवधूत ढेरे परिक्षम घेत आहे
