पं.स.कार्यालयात तालुकास्तरीय किसान कार्यशाळा संपन्न


इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- लोहारा पंचायत समितीच्या सभागृहात तालुका कृषी कार्यालय व आत्मा यांच्या संयुक्त विद्यामानाने तालुकास्तरीय किसान कल्याण कार्यशाळा घेण्यात आली.
  या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थांनी जिल्हा कृषी विस्तार अधिकारी डॉ.टी.जी.चिमणशेट्टे हे होते.याप्रसंगी पशुसंर्वधन विभागाच्या योजना तसेच अझोला उत्पादन,मुक्त संचार गोठा या विषयी माहीती दिली. तुळजापुर येथील कृषी विज्ञान केंद्राच्या अपेक्षा कसबे यांनी खरीपपुर्व हंगामाची तयारी व नियोजन या विषयी माहीती दिली.तर जिल्हा कृषी विस्तार अधिकारी डॉ.टी.जी.चिमणशेट्टे यांनी कृषीक्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञानासंदर्भात शेतकऱ्यांना सविस्तर माहीती दिली.याप्रसंगी लोहारा तालुक्यातील धानुरी येथील प्रगतशिल शेतकरी राम पाटील व खेड येथील प्रगतशिल शेतकरी केशव पाटील यांचा सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाचे प्रस्ताविक तालुका कृषी अधिकारी एन.एन.मगर व सुत्रसंचालन पाटील यांनी केले.तर अभार तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक के.के.पवार यांनी मानले.या कार्यशाळेत 102 शेतकऱ्यांनी सहभागी घेतला होता.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post