पांढरकवडा येथे आयपीएल सट्‌ट्यावर धाड



  • 1,90610 रुपयाचा माल जप्त


मकसूद अली 
यवतमाळ(प्रतिनिधी) :   जिल्ह्यात आयपीएल मधील क्रिकेट मॅचवर मोठ्या प्रमाणात सट्टा लागत असल्याने स्थानिक गुन्हे शाखा यांना मिळालेल्या माहितीवरुन 29 एप्रिल रोजी टोळी विरोधी पथक, स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी आयपीएल 11 सिझनचे सामन्यातील कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंज बंगलोर टिमच्या क्रिकेट मॅचवर हॉट लाईन  पोपट लाईन व मोबाईल फो द्वारे सट्टा घेवून  पैशाची बाजी लावून हारजितचा जुगार अभिनय उर्फ गुड्डू दिलीप राय रा. पांढरकवडा हा त्याचे राहते घरी जुगाराचा अड्डा भरवून सट्टा खेळवत असल्याचे माहितीवन पोलीस उपनिरिक्षक संतोष मनवर यांनी आठवडी बाजार पांढरकवडा येथे सापळा रचून अभिनय राय याचे सट्‌ट्याचे अड्‌ड्‌यावर धाड टाकून त्याला व त्याचे साथीदार सुनिल कल्यान सुलगेवार(37), रवि खिल्लुमल दुंबा (30), सागर कालीदास व्यास (26) रा. पांढरकवडा यांना अटक केली.


 तसेच यातील भागीदार रवि नंदकिशोर बोरेले यालाही अटक केली. सट्टा चालविण्याकरीता उपयोगात येणारे साहित्य एक व्हीडीओकान एलसीडी टीव्ही, साहीत्य अंदाजे 31 हजार 200 रुपये, हॉट लाइन पोपट लाइन सुटकेस संच, दहा मोबाईल रेकार्डर, रिसीव्हरसह अंदाजे 35 हजार रुपये, 14 मोबाईल अंदाजे 91 हजार रुपये, एक एचपी कंपनीचा लॅपटाप 25 हजार रुपये, तीन कॅलक्यु लेटर रुपये 300, सट्टाचे नोंदी असलेले चार कागद व नगदी 8 हजार 110 रुपये असा एकुण 1,90,610 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला.
ही कारवाई पोलीस अधिक्षक एम.राजकुमार, अपर पोलीस अधिक्षक अमरसिंह जाधव, पोलीस निरिक्षक मुकुंद कुलकर्णी यांचे मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक संतोष मनवर, श्रीकांत जिंदमवार, ऋषी ठाकुर, संजय दुबे, गणेश देवतळे, योगेश गटलेवार, अमोल चौधरी, किरण श्रीरामे, आशिष गुल्हाणे, विोद राठोड, राज कांबळे, श्रीधर शिंदे, आकाश सहारे, प्रियंका ढोके, मिनाक्षी जंगले यांनी पार पाडली.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post