खूप दिवस झाले



खूप दिवस झाले 
तू माझ्याशी बोलला नाहीस त्याला 
रुसला आहेस का फसला आहेस  
तेच कळत नाही  मला
माझा आत्माच मला म्हणाला.


तुला कळत नाही कस
दिसत तस मुळीच नसत
चारचौघात बसल्यावर सूचत
वागताना त्यांच्या सारख
कोण हसत कोण रडत
हसण रडण कळत जगाला
कोण उरतो शेवटी सांग बर सोसायला
माझा आत्माच मला म्हणाला.

सगळ्यात मिसळून अलग रहाण 
ही सुद्धा कलाच आसते
सावधपणे शिकून घ्यावीच लागते
रमत गमत आपल्याच नादात
तिला सुद्धा तपासावीच लागते
कुणाची कुणावर मालकी नसते 
तू नको फसायला त्यान नको हसायला
माझा आत्माच मला म्हणाला.

बघ बाबा तू असा वागलास तर
दगडालाही फोडशील पाझर
माणस काय तुझ्या सारखीच सारी
आचार नाही विचार नाही
दुसरे  धावतात म्हणून धावायच
कोण येतोय सांग मग तुला काही  सांगायला
म्हणून म्हणतोय चिंतन कर
सांगेल आत्मा  तेवढच कर
माणूस बन स्वतः ला सावर
लोक म्हणतील छान वागायला लागला
माझा  आत्माच मला म्हणाला.

तुकाराम पाटील
पिंपरी पुणे १७

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post