उस्मानाबाद जिल्ह्याचे नांव डॉ.गिरीष बदोले यांनी उंचावले— आ.बस्वराज पाटील


इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- उस्मानाबाद जिल्ह्यातील उमररगा तालुक्यातील कसगी येथील डॉ.गिरीष बदोले यांनी
केंद्रिय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत राज्यात पहिले व देशात विसावा क्रंमाक मिळवुन जिल्ह्याचे नांव उंचावले आहे,असे प्रतिपादन औशाचे आ.बस्वराज पाटील यांनी केले आहे.
त्यांच्या मुळ गांवी कसगी येथील निवासस्थानी जावुन आ.बस्वराज पाटील यांनी डॉ.गिरीष बदेले यांचा सत्कार करुन पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.या प्रसंगी ते बोलत होते.
शेतकरी  कुटंबातील या सुपूञाने महाराष्ट्रात प्रथम तर देशात 20 वा क्रमांक लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत मिळवला.अवघी दोन एकर शेती घरची परिस्थिती ही हालाखीची असताना केंद्रिय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश संपादन केले.या वेळी उमरगा जनता बँकेचे चेअरमन रामकृष्णपंत खरोसेकर,प्रदिप आबा कुलकर्णी,माजी जि.प.सदस्य दिलीप भालेराव, विठ्ठलसाई सहकारी साखर कारखान्याचे संचालक विठ्ठल बदोले,आदर्श महाविदयालयाचे प्राचार्य दिलीप गरूड,डाॅ.गिरिष बदोले व यांचे आई वडील यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post