(मकसूद अली)
यवतमाळ येथील स्कुल ऑफ स्कॉलर्स या शाळेच्या वतीने यंदा ही १५ टक्के फिवाढीच्या विरोधात पालकांनी ९ एप्रिल रोजी मुकमोर्चा काढला होता.या संदर्भाचे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री,शालेय शिक्षणमंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार यांना देण्यात आले होते. शाळा प्रशासनाने अद्यापही फी कपात केली नसल्याने संतप्त पालकांनी शिवाजी बालोद्यान येथे सामूहिक सभा घेऊन निषेध नोंदविला.नर्सरी ते दहावी पर्यंत शिक्षण असलेल्या शहरातील एस. ओ. एस. शाळेत दरवर्षी कमालीची फीवाढ करण्यात येते.सध्या महाराष्ट्र राज्यात फीवाढीवर नियंत्रणासाठी कोणताही कायदा लागू नाही पण महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारणच्या नियमानुसार कोणतीही शाळा स्वतः या अधिनियमान्वये निश्चित केलेल्या शुल्का पेक्षा अधिकची रक्कम घेऊ शकत नाही अशी माहिती पालकांच्यावतीने देण्यात आली तसेच शाळेच्या कार्यकारी समितीला नव्याने शुल्काची रक्कम निश्चीत करण्याचा प्राधिकार आहे.पण मागील काही वर्षांपासून PTA मेम्बर्स व कार्यकारी समितीचा विरोध असतांना देखील या शाळेत दरवर्षीच वार्षीक फीमध्ये वाढ केली जात असल्याने पालकवर्ग धास्ताविले आहे.
शिक्षणाधिकारी प्राथमिक यांना तक्रारींवर दहा दिवसात अहवाल देण्यात येईल असे या शाळेच्या मुख्याध्यापका मार्फत सांगण्यात आल्याचे वृत्त आहे. या शाळेच्या कार्यकारिणी समितीने जिल्ह्याचे पालकमंत्री मदनभाऊ येरावार यांची देखील भेट घेऊन फिवाढीला आपली संमती नसल्याचे सांगताच पालकमंत्रयांनी यावर तोडगा काढण्यासाठी शाळा व्यवस्थापना सोबत ३० एप्रिल पर्यंत चर्चा घडवून आणण्याचे आश्वासन दिले असल्याची माहिती पालक संघाच्या कोअर ग्रुपच्या वतीने देण्यात आली. आता सर्व यवतमाळकरांच्या नजरा शाळा व्यवस्थापनासोबत होणाऱ्या बैठकीवर लागल्या असून काही तोडगा न निघाल्यास आंदोलन कायम राबवू अशी प्रतिक्रिया पालकांनी दिली.
