चिनगीरी



मन माझे इतके का तुजसाठी झुरते
विरहाला जपताना दरवेळी हसते

असलेले नसलेले झुलवाया सजले
ममतेने बघताना नयनाना दिसते

सरकारी फतव्याना दरबारी मुजरे
करताना जनतेला पिळताना कळते

नवसाने घडते का सुखदायी जगणे
दगडाला पुजताना मनमानी घडते

सजनीची मनधरणी हळवे  मन करते
जगण्याच्या पणतीला चिनगारी पुरते 

वचनांची मनशांती घडलेली असते
कसली ही छळणारी घटना
मग पळते

तुकाराम पाटील
पिंपरी पुणे१७

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post