- युवा सेना जिल्हा सरचीटणीस राजेश पाटील इंगळे यांचा प्रेरणादायी उपक्रम
- स्वत: चे 10 लाख खर्चून करणार पाणिपूरवठा
- योजनेचा प्रारंभ आ. गोपीकीशनजी बाजोरीया यांच्या हस्ते करण्यात आला.याप्रसंगी यूवासेना जिल्हाप्रमूख विठ्ठल सरप पाटील,नगरसेवक शशि चोपडे यांचीउपस्थीती
अकोला :- तिसरे महायूद्ध केवळ ' पाणी ' साठी होणार असल्याचे भाकीत वर्तविले असून, दरवर्षी पाणी टंचाईच्या झळा वाढत असताना, हे भाकीत खरे ठरण्याची भीती व्यक्त केल्या जात आहे माञ याच झळांमध्ये गावकर्यांना पाणी उपलब्ध करून देण्यासाठी स्वतची पदरमोड करणारे अनेकजन समोर येत असून , कीनखेडमध्ये असाच एक भागीरथ अवतरला आहे . हिंदूहदयसम्राट शिवसेनाप्रमूख बाळासाहेब ठाकरे यांचे 80 टक्के समाजकारण 20 टक्के राजकारण हे ब्रीद लक्षात ठेवून यूवासेना जिल्हा सरचीटणीस राजेश पाटील इंगळे यांनी जन्मभूमीचे पांग फेडताना, कीनखेड पूर्णा वासीयांसाठी स्वताची शिल्लक आणी इतरांकडून हात उसनवार घेवून 10 लाख रूपये खर्च करून पाण्याची सोय करण्याचा शूभारंभ केला आहे. 84 खेडीगाव पाणी पूरवठा योजनेतून गावाला दररोज केवळ 3 तास पाणी पूरवठा होतो आणि गावकरी हे पाणी पीण्यासाठी वापरतात. माञ इतरञ वापरासाठी त्यांच्याकडे पाणी राहत नाही. ही बाब लक्षात घेवून, पूर्णा नदीतील वाघ डोहातून गावापर्य॔त 3 कीलोमीटरची पाईप लाईन टाकण्यासाठी 700 पाईप आणि 4 व्हाॅल्व खरेदी केले.आवश्यक सामूग्रीसह इतर बाबीं मीळून 10 लाख रूपये खर्च करून वापरण्यासाठी पाणी उपलब्ध करून देणार असून, महावितरणाकडे विज पूरवठ्यासाठी त्यांनी अर्ज केला आहे. तब्बल 3 कीलोमीटरची पाईप लाईन टाकून गावात पाण्याची व्यवस्था होवू शकते, ही बाब त्यांनी अनेक पूढार्यांकडे बोलून दाखवली माञ प्रतीसाद मीळाला नाही.
स्वताच्या बचतीचे लाखों रूपये खर्च करतांना,त्यांनी
आमदार गोपीकीशन बाजोरीया यांची भेट घेवून ही बाब सांगीतली तेव्हा आ.बाजोरीया यांनी तत्काळ मदतीचा हात पूढे केल्याने, मोठा आधार मीळाल्याचे राजेश पाटील यांनी सांगीतले . या योजनेतून वापरण्यासाठी पाणी पूरवठा सूरू झाल्यानंतर जवळपास 15 लाख रूपये खर्च करून डोहाजवळ जलशूध्दीकरण यंञणा उभारून पीण्याच्या पाण्याचा प्रश्नही सोडविण्यात येईल , असे त्यांनी सांगीतले . कीनखेड पूर्णामधील या आधूनिक भागीरथाच्या योजनेचा प्रारंभ आ. गोपीकीशन बाजोरीया यांच्या हस्ते करण्यात आला.याप्रसंगी यूवासेना जिल्हाप्रमूख विठ्ठल सरप पाटील,नगरसेवक शशि चोपडे ,आणि जिल्हा सरचीटणीस राजेश पाटील, सर्कल प्रमूख प्रकाश गोडचवर, सोशल मीडीया पमूख स्वप्निल अहिर , संतोष धनभर, रामचंद्र इंगळे, निरंजन दामोदर, विजय इंगळे, डॉ .गजानन इंगळे, दीलीप ओईंबे, बाळासाहेब तायडे, प्रभाकरराव लांडे, श्यामसींग डाबेराव, बळीराम इंगळे, धनराज मूंदडा, शंकर गवई, भालेराव, सतीश इंगळे, आदेश पातोंड, शूभम इंगळे, चेतन पतींगे ,व समस्त गावकरी उपस्थित होते .

