सय्यद मुजीबोद्दीन, पुसद यवतमाळ :- एखाद्याकडे वाहतूक परवाना किंवा वाहनांची कागदपत्रे नसतांना अश्यात पांढ-या वर्दीतील वाहतूक पोलीस समोर दिसल्यास निश्चित देवळातला देव आठवल्या शिवाय राहत नाही, बिना परवाना किंवा गाडीचे कागदपत्रे न बाळगता वाहतूक करणा-यांना दंड ठोठावण्याची डिव्हटी बजावणा-या या वाहतूक पोलीसां प्रती प्रचंड चिड जनमानसात आहे मात्र यवतमाळ जिल्ह्यातील पुसद वाहतूक पोलीसांनी आपल्या याच सक्तीच्या डिव्हटी बरोबर एका वृद्धाची सेवा आपल्या मात्या पित्या प्रमाणे करुन दाखविल्याने त्यांच्या मानुसकीचे निश्चित करावे तितके कौतुक कमीच आहे,
वाशिम जिल्ह्यातील ब्रम्हा येथील ६५ वर्षीय कोंडीबा धोंडीबा बोरपल्ले हा वृध्द इसम पुसद शहरात भर उन्हात उपाशी पोटी एका कडेला पडून होता.रखरखत्या उन्हात, मळलेल्या कपड्यातील या वृध्दाकडे गेल्या अनेक तासात उपस्थित हजारो लोकांच्या नजरापैकी पुसद वाहतूक शाखेचे शिपाई पंढरीनाथ काकड, अतुल दातीर, ग्यानबा मुंडे, दिपक ढगे व राहूल काटकर या वाहतूक पोलिसांच्या नजरा गेल्या मोठ्या आस्थेने या वृध्दाची चौकशी केल्यावर ह्रदयाला पाझर फुटले, कारण त्याच्या या अवस्थेला त्याचे स्वतःचे मुल व सुना असल्याचे कोंडीबाने सांगून पोलिसां जवळ हंबरडा फोडला. गहिवरलेल्या पोलिसांनी कोंडीबाला पोलिस ठाण्यात आनले अंघोळ घालुन, पोटभर जेवू घातले, इतकेच नव्हे तर नविन कपडे देऊन त्याला त्याच्या गावाकडे जाणा-या एस टी बस मध्ये बसविले वाहतूक पोलीसांनी वृध्दांप्रती दाखविलेल्या या आस्थेला बघून निश्चित पोलिस वर्दीतील मानुस व त्यांची समाजाप्रती असलेली मानुसकी अगदी स्पष्टपणे जाणवली आहे.
