दारव्हा येथील नोटा बदलून देणा-या टोळीतील दोघांना अटक दिनांक 9 पर्यंत पोलीस कोठडी



मुर्तिजापूर( प्रतिनीधी) बनावट नोटांच्या माध्यमातून फसवणूक करणा-या दारव्हा येथील टोळीचा मुख्यसुत्रधारासह त्याच्या एका जोडीदाराला अकोला जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्या विषेश पथकाने अत्यंत चाणाक्षपणे सापळा रचून अटक केली. सदर कारवाही दिनांक 4 रोजी सांयकाळी करण्यात आली. एक लाख रूपयांच्या मोबदल्यात तीन लाख रूपये देण्याची
बोलणी सदर आरोपींसोबत झाली होती. यातील तीन आरोपी फरार झाले आहेत. पोलीस अधिक्षक यांच्या विशेष पथकाचे प्रमुख सहाययक पोलीस निरिक्षक हर्शराज अळसपूरे यांना नोटा बदलून देणा-या टोळीचा सुगावा लागला होता. जिल्हयात चलनी एक लाख रूपयांच्या नोटांच्या बदल्यात तीन लाख बनावट परंतु असली नोटांसारख्या दिसणा-या नोटांचे आमिष दाखवून असली चलनी नोटा लुबाडणा-या टोळीला गजाआड करण्यात या पथकाला यश आले आहे. पोलीसांनी एक नकली ग्राहकाच्या माध्यमातून टोळीतील प्रज्ञेश रूपेश पाटील राहणार  (अंबादेवी मंदीर दारव्हा )याच्याशी संपर्क केला.त्यानंतर प्रज्ञेष पाटील व गणेश शेषराव ठक्कर राहणार( एम आय डि. सी. दारव्हा) यांनी त्याला एक लाख रूपये घेवून मुर्तिजापूर येथील टावरी हाॅस्पीटल समोर घेवून येण्याचे सांगितले. सदर घडामोडीनुसार पोलीसांनी हाॅस्पीटल जवळ सापळा लावला. एक लाख घेवून नकली ग्राहक सदर ठिकाणी आला असता पोलीसांनी प्रज्ञेष पाटील व गणेश ठक्कर या दोघांना पकडले. तर अतुल तायडे वय 26 राहणार कारंजा जि. वाशिम, आदेश रूपेश पाटील वय 20 राहणार अंबादेवी मंदीर दारव्हा, गौतम कोठारी वय 28 राहणार जैन मंदीर दारव्हा हे तीघे पसार झाले. सदर प्रकरणी मुर्तिजापूर पोलीसस्टेषनला कलम 399,402 भादवी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही आरोपींना विद्यमान न्यायालयाने दिनांक 9 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post