शासकिय कामात अडथळा आणुन मारहाण ,गुन्हा दाखल

शफी खान
कुरूम : कर्तव्यावर असलेल्या येथिल विज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्याला अश्लील शिवीगाळ व मारहाण करून शासकिय कामात अडथळा निर्माण केल्याची घटना शुक्रवार दि.६ एप्रिलला दुपारी १:३५ वाजतादरम्यान कुरूम शिवारातील खोसला डि.पी.जवळ घडली.याप्रकरणी पो.स्टे.माना येथे आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
          प्राप्त माहितीनुसार कुरूम येथे विज वितरण कंपनी कार्यालयात तंत्रज्ञ म्हणून कार्यरत असलेल्या राहुल साहेबराव काळे वय २८ वर्ष रा.अंबा विहार अमरावती हे खोसला डिपीवर फाँल्ट असल्यामुळे आपला सहकारी प्रशांत थेर सोबत फाँल्ट काढण्यासाठी गेले असता आरोपी आतीश सुखराम चव्हान रा.पारधीवाडा याने शासकिय कामात अडथळा आणुन अश्लील शिवीगाळ करून थापडा, बुक्यांनी मारहाण केली. याप्रकरणी पो.स्टे.माना येथे  राहुल काळे यांच्या फिर्यादीवरून आरोपी आतीश चव्हान याच्याविरूध्द कलम ३५३,३२३,५०४ नुसार गुन्हा दाखल झाला असुन पुढिल तपास  कुरूम पोलीस चौकिचे हे.काँ.बाळकृष्ण नलावडे करित आहे.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post