बहुजन समाज पार्टीचे आंदोलन



 यवतमाळ (प्रतिनिधि मक़सूद अली)
अनुसूचीत जाती, जमाती अंतर्गत कायद्यात शिथील करण्यात आला आहे. हा अनुसूचीत जाती, जमाती समाजावार अन्याय करणारा असून, सदर कायदा शिथील झाल्यास देशातील संपूर्ण लोकांवर अन्याय होण्याची शक्यता आहे. हा कायदा शिथील करू नये, अशी मागणी घेवून आज, दि. २ एप्रिल रोजी बहुजन समाज पार्टीच्या वतीने आंदोलन करण्यात आले. दरम्यान, मो. मारीक साहिर लोखंडवाला यांच्या नेतृत्वात निवेदन सादर करण्यात आले. अनुसूचीत जाती, जमाती कायद्यातील झालेल्या फेरबदलाच्या विरोधात आज, दि. २ एप्रिल रोजी भारत बंद पुकारलेला होता. या आंदोलनाला बहुजन समाज पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा मायावतींनी पाठींबा दर्शविला आहे. त्या अनुषंगाने बहुजन समाज पार्टीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. अनूसुचीत जाती, जमाती कायद्यातील फेरबदल रद्द न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा बहुजन समाज पार्टीचे मो. तारीख साहिर लोखंडवाला, प्रकाश राऊत, पंडीत दिघाडे, राजेंद्र कांबळे, प्रफुल शंभरकर, शिवप्रसाद राऊत, गणेश धवने यांच्यासह इतरही पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post