इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- एकच ध्यास माझ्या मराठी शाळेचा विकास असे प्रतिपादन सुनील माने यांनी केले.
लोहारा तालुक्यातील सास्तुर येथील श्री शांतेश्वर प्राथमिक विद्यामंदिर या शाळेत 1986 पासुन तब्बल 31 वर्ष सेवेत तत्परता,निष्ठेने व चिकाटीने शिक्षक म्हणुन कार्य केलेले शिक्षक सुनिल माने यांची मुख्याध्यापक म्हणुन पदोन्नती झाली आहे.सुनिल माने यांचा ग्रामस्थ,शालेय समिती व मित्रपरिवाराच्यावतीने यथोचित सत्कार करण्यात आला.या प्रसंगी ते बोलत होते.या सत्कार समारंभाप्रसंगी सुनील माने पुढे बोलताना म्हणाले कि,सध्या मराठी शाळेची महाराष्ट्रात दयनीय अवस्था आणि पालकांची ह्या शाळेकडे पाहण्याची दृष्टिकोन बदलले आहे आणि ते माझ्या परीने मी माझ्या शाळेचा कायापालट करण्याचा निर्धार केला आहे.असे यावेळी सांगीतले.यावेळी उमरगा शहरातील अँड.सयाजी शिंदे,उमरगा नगर सेवक तथा गटनेते संजय पवार,एन.टी.व्ही.न्युज मराठी चे प्रतिनिधी सचिन बिद्री,तुलसी मोबाईलचे गोविंद हराळकर,सुनील मेंगशेट्टी आदींनी सुनिल माने यांचा पुष्पहार,शाल,श्रीफळ देऊन सत्कार केला.व त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
या सत्कार समारंभ कार्यक्रमास सुजित माने,विनीत इंगळे,ओम जगताप,अंबादास पवार,यांच्यासह ग्रामस्थ व मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
