"बेगुनाह कैदी" या विषयावर यवतमाळ येथे चर्चासत्र



प्रतिनिधी सय्यद मोहसीन
 यवतमाळ :- यवतमाळ येथील ऑल इंडीया कौमी तंजीमच्या वतीने "बेगुनाह कैदी" या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते सेव्हन इलेव्हन मुंबई ट्रेन ब्लास्टच्या आरोपाखाली तब्बल नऊ वर्षे तुरुंगात राहून न्यायालयाच्या वतीने निर्दोष सुटका करण्यात आलेले अब्दुल वहीद सर यांनी आपल्या पुस्तकातून त्या नऊ वर्षाचे चित्रण कसे केले गेले याची माहिती दिली.अकरा जुलाई 2006 रोजी माटुंगा ते मीरा रोड दरम्यान लोकल ट्रेन मधे लागोपाठ सात बम धमाके झाले होते यात 187 लोक मृत्युमुखी पडले होते व 817 जखमी झाले होते. या प्रकरणात मुंबई एटीएस ने १३ तरुणांवर आरोप करून त्यांना तुरुंगात ठेवण्यात आले होते. मकोका कोर्टाने दिलेल्या निर्णयात या पैकी पाच तरुणांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती व इतरांना आजन्म कारावासाची शिक्षा सुनावण्यात अली होती.जमीयतुल उलेमा-हिंदच्या वकीलाने केलेल्या युक्तीच्या जोरावर अंजुमन-ए-इस्लाम या शाळेतील शिक्षक अब्दुल वहीद सर यांना निर्दोष सोडण्यात आले.नऊ वर्षे तुरुंगात असतांना  त्यांनी बेगुनाह कैदी ही पुस्तक लिहिली होती.त्यात त्यांनी सर्व तरुणांवर लावलेले आरोप खोटे असून त्यांना खोट्या आरोपात कसे गोवण्यात आले याचा खुलासा केला असल्याचे ते यावेळी बोलले.तसेच १२ निष्पाप लोकांच्या सुटकेसाठी संपूर्ण महाराष्ट्रभर फिरून जनजागृती करत राहण्याचा मानस यावेळी त्यांनी व्यक्त केला.
याप्रसंगी  सामाजीक कार्यकर्ता अंजुम इनामदार,मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष डॉ.दिलीप महाले,प्रा.माधव सरकुंडे,मंसूर एजाज जोश,अजमतूल्लाह खान,ऑल इंडीया कौमी तंजीमचे विदर्भ अध्यक्ष असीमअली,डॉ.वसीउल्लाह व फरहान मुजतबा आदी उपस्थित होते.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post