खून प्रकरणातील मुख्य सुत्रधारासह सहा आरोपींना रायगड येथून अटक



यवतमाळ(प्रतिनिधी) : 27 मार्चला यवतमाळनजीकच्या पारवा गावात भरदिवसा झालेल्या मंगेश गावंडे याच्या खुनातील मुख्य सहा आरोपींना  स्थानिक गुन्हे शाखा, टोळीविरोधी पथक व विशेष पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी खोपोली जि.रायगड येथून 5 एप्रिल रोजी ताब्यात घेतले. गुन्हा घडला तेव्हापासून हे आरोपी फरार होते. हा खुन भरदिवसा झाल्याने शहर व परिसरातील जनतेत असंतोष पसरला होता. गुन्ह्यातील मुख्य सुत्रधार व इतर आरोपींना तात्काळ अटक करण्याकरीता मृतकाचे  नातेवाईकांनी आग्रह धरला होता. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस अधिक्षक एम.राजकुमार, अपर पोलीस अधिक्षक अमरसिंह जगताप, एसडीपीओ पियुश जगताप, पोलीस निरिक्षक मुकूंद कुलकर्णी, टोळी विरोधी पथक व विशेष पथके रवाना केली होती.
आरोपी प्रविण भगत व भिमराव अवथरे रा.पारवा यांना टोळी विरोधी पथकाने अटक केली होती. त्यांचेकडून मिळालेल्या माहितीवरुन सुनिल देवतळे, हनुमान पेंदोर रा. पारवा यांना बोथबोडन येथून ताब्यात घेतले होते.  अन्य आरोपी घाटंजी परिसरात लपुन असल्याची माहिती प्राप्त झाली हा ेती.  परंतु येथून ते पसार झाले होते. मुख्य सुत्रधार व अन्य आरोपीच्या शोधासाठी पथके मागावर होती. दरम्यान खबरी कडून कळले की आरोपी मुंबईकडे रवाना झाले.  यानंतर पोलीस कुर्ला, मुलूंड, डोंबीवली परिसरात तळ ठोकून होते.


29 मार्चपासून गुन्ह्यातील सहा आरोपी खोपोली येथे एका डालडा बनविणारे कंपनचे बाजुला असलेल्या बांधकामावर मजुर म्हणून काम करीत असल्याचे कळले. येथे जावून आरोपी ओळखने कठीण होते म्हणून सायंकाळी पाच तास गेटवर सापळा रचून आरोपी राज गोपाल ठाकुर (29), मुन्ना गोपाल ठाकुर( 27), विनोद प्रकाश चपरीया (36), भुपेंद्र उर्फ गोपी मनीराम शिबलकर (19), शुभम सुरेश टेकाम (22), सुमीत उर्फ पांड्या महादेव मेश्राम (20) सर्व रा.पारवा यांना ताब्यात घेतले. त्यांना 6 मार्च रोजी यवतमाळला आणण्यात आले. या गुन्हतील आरोपींची संख्या आता दहा झाली आहे. ही कारवाई पोलीस अधिक्षक एम राजकुमार यांचे मार्गदर्शनात  संदीप चव्हाण, संतोष मनवर, ऋषी ठाकुर, सैय्यद साजीद, संजय दुे, अजय डोळे, अमोल चौधरी, रुपेश पाली, प्रदिप  नाईकवाडे, योगेश  डगवार, विनोद राठोड, जयंत शेंडे, श्रीधर शिंदे, राम सोलंकी, यशवंत जाधव, योगेश गटलेवार, अजय ढोले यांनी केली.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post