प्रवीण वैष्णव
तेल्हारा दि:- तेल्हारा तालुका शेतकरी सल्ला गार समितीच्या आज दि 19 एप्रिलला कृषी विभाग कार्यालयात संपन्न झालेल्या बैठकीत सर्वानुमते तेल्हारा पंचायत समितीच माजी सभापती भाजपा जिल्हा उपाध्यक्ष गजानन नळकांडे यांची आत्मा समितीच्या अध्यक्ष पदी अविरोध निवड करण्यात आली सदर बैठकीच्या अध्यक्ष स्थानी तालुका कृषी अधिकारी अविनाश मेश्राम होते या वेळी अध्यक्ष पदा करिता गजानन नळकांडे यांचे एकमेव नाव आल्याने त्यांची अविरोध निवड करण्यात आली यावेळी आत्मा समितीचे सदस्य रमेश दुतोंडे सदानंद खारोडे अनिल पोहणे शंकरराव ताथोड अशोक नराजे सुचिता शेळके ज्योती वसू कमलाबाई चंदन राजकुमार शेंडे अनिल कराळे रत्न प्रभा गव्हाळे सुनीता बगाळे वंदना कवळकर तसेच समिती सचिव नेमाळे, देशमुख आदी उपस्थित होते गजानन नळकांडे आपल्या निवडीचे श्रेय राज्याचे कृषी मंत्री ना भाऊसाहेब फुंडकर खा संजय धोत्रे पालकमंत्री ना डॉ.रणजित पाटील आ प्रकाश भारसाकळे भाजपा जिल्हा अध्यक्ष तेजराव थोरात तालुका अध्यक्ष गजानन उंबरकार ओम सुईवाल आदींना देतात