मडकोना येथे मारवाडी महिला मिडटाऊन तर्फे श्रमदान व श्रमदानाच्या साहित्याचे वितरण




मकसूद अली 
 यवतमाळ :- अखिल भारतीय मारवाडी मिडटाऊन शाखा यवतमाळच्या वतीने पाणी फाऊडेशन व्दारे आयोजित सत्य मेव जयते वॉटर कप स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविण्यात आला असून अखिल भारतीय मारवाडी मिडटाऊन शाखेच्या वतीने मडकोना हे गाव दत्तक घेण्यात आले. दत्तक घेण्यात आलेल्या या गावामध्ये अखिल भारतीय मारवाडी महिला मिडटाऊन शाखेच्या वतीने श्रमदान व मडकोना गाव वासिकांना श्रमदानासाठी आवश्यक असलेले साहित्य पंचविश टोपले, दहा फावडे हे साहित्य देण्यात आले. या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून तहसिलदार सचिन शेजाल, मिडटाऊन संस्थापिक सौ. पुनम जाजू माहेश्‍वरी मंडळाचे ज्येष्ठ सदस्य प्रकाश जाजु,  सचिव हरगोविंद चांडक, लायन्स क्लब झोन चेअर पर्सनल सुनिल जोशी या प्रसंगी आवर्जून उपस्थित होते. प्रकल्पाच्या यशस्वीतेसाठी संस्थेच्या अध्यक्षा दिपा जोशी, सचिव सौ. ममता चांडक, कोषाध्यक्ष विमलेश मनक्षे, सदस्य सौ. सुनिता मुंधडा, सौ. संगिता वैष्णव, सौ. शिला भुतडा आदी प्रयत्न शिल होते. श्रमदान कार्यक्रमाच्या समारोपा नंतर श्रमदान करणार्‍या गावकर्‍यांना व उपस्थितीतांना अल्पपोहार वितरीत करण्यात आले.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post