मकसूद अली
यवतमाळ :- नेर तालुक्यातील इंद्रठाणा या ग्रामपंचायतची मुख्यमंत्री देवेंद्र ङ्गडणवीस यांच्या संकल्पनेतुन आदर्श ग्रामपंचायतकडे वाटचाल सुरू असून या परिसरामध्ये येणार्या इंद्रठाणा, ङ्गत्तापुर, मुकींदपुर, पिंप्री इजारा, पारधीबेडा (मु.) आणि पेंढारा या इंद्रठाणा ग्रामपंचायत अंतर्गत येणार्या सहा गावामधील जिल्हा परिषद शाळा ह्या डिझीटल करण्यात आल्या असून मागील एका वर्षाच्या कारकिर्दीमध्ये जवळपास 200 शौचालय बांधण्यात आले असून मुख्यमंत्री ग्रामविकास ङ्गेलो, राजु केंद्रे यांच्या पुढाकारातुन तीन गावे हागणदारीमुक्त करण्यात आली आहे. पारधी बेड्यावर विशेष लक्ष केंद्रीत करून तेथे मिटर जोडणी, शाळा डिझीटल, पाण्याचा प्रश्न, बचत गट सबळीकरण, तसेच 65 ते 70 कुटुंबियांचा अंत्योदय योजनेचा महत्वपुर्ण प्रश्न मार्गी लावण्यात आला. ग्रामपंचायत अंतर्गत येणार्या टंचाईग्रस्त गावांचा प्रश्न मार्गी लावण्याकरीता मुख्यमंत्री ग्राम सामाजिक निधीतुन चार लाखांची तरतुद करून गावांना पाणीदार करण्याच्या प्रयत्नांना प्रारंभ झाला.
बचतगटाचे सबळीकरण व उद्योग निर्मिती, शेतीपालन आदी उपक्रम आवर्जुन राबविण्यासत येत आहे. शाळांमध्ये नवोपक्रम, बोलक्या भिंतींचा विशेष उपक्रम हाती घेतला आहे. जिल्ह्यातील अग्रगण्य शाळा करण्याकरीता विशेष प्रयत्न सुरू आहे. गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजने अंतर्गत इंद्रठाणा ग्रामपंचायत येथील दोन पाझर तलावांच्या कामामुळे आतापर्यंत 50 हजार क्युबीक मिटर गाळ काढण्यात आला. ह्यामुळे 5 कोटी लिटर पाणी साठवण्याची क्षमता वाढेल. पंचक्रोषीतील 15 गावातील 125 शेतकरी बांधवांना यांचा लाभ होणार आहे. आता पर्यंत 17 हजारांपेक्षा जास्त ट्रॉली गाळ काढुन एक उच्चांक या योजने अंतर्गत गाठण्यात आला आहे. 400 एकर शेतीमध्ये हा गाळ टाकण्यात आला आहे. मुख्यमंत्री ग्रामविकास ङ्गेलो राजु केंद्रे यांच्या संकल्पनेतुन व पुढाकाराने नवीन वर्षाचे स्वागत इंद्रठाणा ग्रामपंचायत अंतर्गत येणार्या सहाही गावांमध्ये दुध वितरण कार्यक्रम घेवुन आगळ्यावेगळ्या पध्दतीने साजरा करण्यात आला. व सोबतच व्यसनाधिनतेच्या विरोधात संकल्पही घेण्यात आला. यामध्ये लोकांचा सक्रीय सहभाग होता.
शराब नही, दुध पियेंगे, कमजोर नही, सशक्त बनेेंगे, अशा घोषणा देण्यात आल्या असून महिला ग्रामसभेसह महिलांना विकास प्रक्रियेत सहभागी करून आगळेवेगळे उपक्रम ग्रामपंचायत परिक्षेत्रामध्ये राबविण्यात येत आहे. महराष्ट्र विलेज सोशल ट्रांन्सङ्गॉरमेशन ङ्गाउंडेशन च्या माध्यमातुन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र ङ्गडणवीस यांच्या 1 हजार विलेज मिशन या धोरणाची अंमलबजावणी करण्यात येत असून सार्वजनिक खाजगी भागिदारास चालना देवुन महाराष्ट्राच्या खेडेगावात कल्याणकारी परिवर्तन घडविण्याचया ध्येयदृष्टीने डिझीटल कनेक्टीव्हिटी, पक्की घरे, पाणी सुरक्षा, कौशल्य विकास, पर्यावरण संरक्षण, कृषी उत्पादकता, शिक्षक स्वच्छता, आदी उपक्रम राबवुन खेड्यांनी सक्षम व्हावे आणि होणारा बदल हा स्वयक्रियतुन शाश्वत असावा या उद्देशाने मुख्यमंत्री रोलर डेव्हलपमेंट, ङ्गेलोशिप कार्यक्रमा अंतर्गत निर्माण झालेली यंत्रणा सामाजिक, आर्थिक ग्रामीण परिवर्तनासाठी एक समान व सहयोगात्मक, प्रेरक बनेल या हेतुने ग्रामपंचायत क्षेत्रात येणार्या सर्व खेडेगावात वेळेवर आणि प्रभावी परिवर्तन घडुन आणावे यासाठी त्या खेडेगांवांना माननिय मुख्यमंत्री देवेंद्र ङ्गडणवीस हे सक्षम बनवित आहे. ग्रामपंचायत डेव्हलपमेंट प्लँन्टस म्हणुन स्विकारण्यात आल्या आहे. स्थानिक प्रशासन व डिएमसी समवेत सहकार्याने शासकीय योजनांची अंमलबजावणी वेगाने करीत आहेत. ग्रामीण संस्थांना विज पुरविण्यासाठी सौर विज प्रकल्पासारख्या अनेक प्रकल्पाची अंमलबजावणी इंद्रठाणा ग्रामपंचायत परिक्षेत्रामध्ये ग्राम प्रर्वतक राजु केंद्रे यांच्या माध्यमातुन होत आहे.