![]() |
लोहारा/प्रतिनिधी :- आपली संस्कृती ही चांगल्या काम करणाऱ्या व्यक्तीचा सतत सन्मान करते हीच परंपरा बसव प्रतिष्ठानने जपत महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान केला.अशा पुरस्काराने व्यक्तीच्या कार्याला अधिक गती व प्रोत्साहन मिळते त्यामुळे त्यांचे काम वाढत जाते.समाजातील वाईट गोष्टींना बाजूला सारुन सतत अपेक्षशिवाय कार्य करणाऱ्या व्यक्ती या समाजाच्या भूषण असतात,असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते शरण पाटील यांनी केले महात्मा बसवेश्वर यांच्या 887 व्या जयंती निमित्त बसव प्रतिष्ठाणच्यावतीने उमरगा तालुक्यातील मुरुम येथे जि.प.कन्या शाळेचे सभागृहात दि.19 एफ्रिल रोजी सांयकाळी राज्यस्तरीय बसवरत्न पुरस्कार सोहळा घेण्यात आला.याप्रसंगी या सोहळ्याचे उदघाटन करुन ते बोलत होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समन्वय समिती माजी अध्यक्ष नागण्णा वकील(लोहारा) होते.या वेळी प्रमुख म्हणुन नगरसेवक श्रीकांत बेंडकाळे(मुरुम),स.पो.नि.मुस्तफा शेख,संजय सागर,बसव प्रतिष्ठानचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष रामलिंग पुराणे,नाईक नगरचे सरपंच योगेश राठोड, वि.का.से.सो.चे संचालक व्यंकट बेंडकाळे,
जालिंदर कोकणे,सुधाकरराव पाटील,आदि उपस्थित होते.या वेळी शरणजी पाटील यांच्या हस्ते विविध क्षेत्रातील पुरस्कार प्राप्त व्यक्तींना सन्मानचिन्ह,
![]() |
प्रशस्तीपत्र,शाल,पुष्पहार घालून कृषीरत्न पुरस्कार संजय मिणियार,समाजरत्न पवन गिरवलकर, गिरवलकर,वैद्यकीयरत्न डॉ.संगिता हंगरगे व डॉ. चंद्रशेखर हंगरगे,शिक्षणरत्न डॉ.विजय गाडे, पत्रकाररत्न दै.पुण्यनगरीचे तालुका प्रतिनिधी बालाजी वडजे(उमरगा),भाजप मिडिया विभाग तालुका अध्यक्ष तथा जिल्हा मराठी पत्रकार संघटना तालुका अध्यक्ष इकबाल मुल्ला(लोहारा),दै.लोकमतचे तालुका प्रतिनिधी समीर सुतके(उमरगा),परळीचे आत्म लिंग शेटे,पोलीस प्रशासनरत्न स.पो.नि.मुस्तफा शेख, साहित्यरत्न भाऊराव सोमवंशी,क्रीडा रत्न राजकुमार सोमवंशी,प्रा.डॉ.रमेश पाथरे,समाजरत्न सोमनाथ कोरे,जालिंदर कोकणे,संजय पोतदार,शिक्षणरत्न प्रा.डॉ.शिला स्वामी,प्रा.डॉ.विलास खडके,भगवान कांबळे,शिवशंकर त्रिगुळे,जीवन होनराव,ग्रंथालयरत्न मोहन गोरे,तंत्रस्नेहीरत्न सुनिल राठोड,मल्लीनाथ सुरवसे आदिंचा सन्मान मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.विशेष जीवन गौरव पुरस्कार माजी शिक्षणाधिकारी मंगेश सागर व त्यांच्या पत्नी कस्तुराबाई सागर असे 26 नागरिकांना या वेळी मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.यावेळी सत्काराला पुरस्कारा पाठिमागील भावना प्रातिनिधीक स्वरुपात सहाय्यक पो.नि.मुस्तफा शेख यांनी व्यक्त केल्या.या कार्यक्रमाचे प्रस्ताविक डिजिटल पध्दतीने बसव प्रतिष्ठाणचे संस्थापक अध्यक्ष रामलिंग पुराणे व सुत्रसंचालन उल्हास घुरघुरे यांनी केले.तर आभार कमलाकर मोटे यांनी मानले.
या कार्यक्रमास शिवराज पुराणे,शेखर माळी,सिद्राम अष्टेकर,बाबु मुल्ला,अशोक घोडके,बेडजुर्गे सूर्यकांत, भीमाशंकर आरवतकर,प्राचार्य शहाजी जाधव, पत्रकार बालाजी बिराजदार,गिरीश भगत,नगरसेवक बाळासाहेब कोरे,माणिक तिगाडे,राजू मुल्ला,सुजित शेळके,यांच्यासह परिसरातील नागरीक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.