इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- लोहारा तालुक्यातील वडगाव गांजा येथे महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती दिनांक 11 एप्रील रोजी साजरी करण्यात येत आहे.या महात्मा फुले जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी सामाजीक कार्यकर्ते नागेश फुलसुंदर यांची तर उपाध्यक्षपदी राजेश फुलसुंदर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.या जयंती उत्सव समितीची बैठक सरपंच बबन फुलसुंदर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.
अध्यक्षपदी नागेश फुलसुंदर,उपाध्यक्षपदी राजेश फुलसुंदर,सचिवपदी दशरथ माळी व गणेश फुलसुंदर,
कोषाध्यक्षपदी अमोल साळुंके,प्रसिध्दी प्रमुख अर्जुन माळी व भुजंग माळी,यांची निवड करण्यात आली.
यावेळी विलास फुलसुंदर,तुकाराम साळुंके,अमर माळी,सुग्रीव माळी,सोमनाथ फुलसुंदर,आदिनाथ फुलसुंदर,गोपाळ फुलसुंदर,गणेश म्हेत्रे,डॉ.ज्ञानेश्वर फुलसुंदर,संजय फुलसुंदर,महावीर माळी, निलेश साळुंके,ज्ञानेश्वर साळुंके,अच्युत माळी,अमोल फुलसुंदर,सुदर्शन फुलसुंदर,दत्ता माळी, तुकाराम फुलसुंदर,यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.