महाराष्ट्र राज्य ग्रामिण पत्रकार संघटनेची नविन कार्यकारीणी जाहीर

यवतमाळ। ८ एप्रिल
प्रतिनिधी : येथील शासकीय विश्रामगृहामध्ये रविवार दिनांक १ एप्रिल २०१८ रोजी पत्रकारांच्या विविध प्रश्नांवर चर्चा व नविन कार्यकारीणी संदर्भात महाराष्ट्र राज्य ग्रामिण पत्रकार संघ र.न.महा./ए.के.एल.६७६५/एफ ५९६२ अकोला संस्थापक स्व. पि.एल.शिरसाठ यांच्या ध्यय्यधोरणावर  व संबंधीत केंद्रीय कार्यकारीणीच्या आदेशानुसार यवतमाळ जिल्ह्यातील संपुर्ण तालुक्यातील जुनी कार्यकारीणी बराखस्त करुन नविन कार्यकारणी घोषीत करण्यात आली.
    यामध्ये वणी तालुका अध्यक्ष विलास बुच्चे,आबीद हुसेन, पांढरकवडा तालुकाध्यक्ष रफीक खान, पाटणबोरी अध्यक्ष मोबीन तिगाले, पारवा अध्यक्ष रमेश पाटील, घाटंजी पांडूरंग निवल, राळेगाव संजय धोटे, कळंब बापू मांडळे, बाभुळगाव तालुका अध्यक्ष सचिन पुरी, दारव्हा रंजीत झोंबाळे,  मारेगाव तालुकाअध्यक्ष श्रीधर सिडाम, पुसद तालुकाध्यक्ष दिपक हरीणकर, महागाव तालुकाअध्यक्ष ज्ञानेश्वर ठाकरे आदींची नियुक्ती करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र राज्य ग्रामिण पत्रकार संघाचे कें्रदीय राज्याध्यक्ष पवन वानखडे, संस्थापक उपाध्यक्ष शैलेष अलोणे, राज्य सचिव राजेश डांगटे, आकोला जिल्हाध्यक्ष गोपाल नारे, यवतमाळ जिल्हाध्यक्ष तथा विदर्भ अध्यक्ष तसेच दै.यवतमाळ नगरी या वृत्तपत्राचे संपादक प्रविण रापर्तीवार, विदर्भ कार्याध्यक्ष विनोद पवार, दै.यवतमाळ नगरीचे सह संपादक रवी माळवी, पत्रकार संरक्षण समितीचे संस्थापक अध्यक्ष विनोद पत्रे  आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post