इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- राज्यात होणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी मानवी कष्टाचे मुल्य ठरवावे,अशा विविध मागण्यांचे निवेदन लोहारा शहरातील व तालुक्यातील शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्याकडे केली आहे. या निवेदनात म्हटले आहे कि,सद्या परिस्थितीत शेतकरी व शेतमजुर हलाखीच्या परिस्थितीत जिवन जगत आहेत.यातुनच आत्महत्या सारखे पाऊल यवतमाळ जिल्ह्यातील राजुवाडी येथील शेतकरी शंकर चायरे यांनी आत्महत्या करुन जिवन संपवले आहे.सामान्य शेतकरी,शेतमजुरांना शेती कामे करुन शेती माल पिकवितो.या शेतीमालाला शासकीय कर्मचाऱ्यांचा एक दिवसाचा पगार एवढा सुध्दा भाव एक क्विंटल शेतीमालाला मिळत नाही.शेतीमालाला अंत्यत कमि भाव मिळत आहे.त्यामुळेच शेतकऱ्यांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणात होत आहेत.शेतकरी,शेतमजुर व कष्टकरी हा केंद्र बिंदु समजुन शासनाने मानवी कष्टाचे मुल्यमापन करुन शेती मालाला योग्य भाव देवुन शेतकऱ्यांच्या थांबविण्यासाठी प्रयत्न करावे,अशी मागणी निवेदनात केली आहे.या निवेदनावर आयनोद्दीन सवार,आयुब अब्दुल शेख,बस्वराज भगवानराव पाटील,सुखा सातपुते,मोहन वचने पाटील,अरविंद परिट,दत्तात्रय पाटील,अजय माळी,अदि शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.