मुर्तिजापूर रेल्वे पोलिस चौकीचा कारभार दोघांच्या खांदयावर




  • उपनिरिक्षक आणि सहाययक पोलीस उपनिरिक्षक संभाळतात कारभार
  • पोलिसांचा राबता नसल्याने गुन्हेगार झाले सैराट 
  • अनेक महिण्यांपासून 17 पदांपैकी 15 पदे रिक्त 


मुर्तिजापूर (प्रतिनीधी) :- मुर्तिजापूर येथील रेल्वे पोलिस दुरक्षेत्र चौकी इंग्रजांच्या काळापासून कार्यरत आहे. रेल्वेचा कारभार दिवसेंदिवस विस्तारत असतांना पोलिस चौकीचा कारभार मात्र इंग्रज कालीन असल्याचे या चैकीचा सध्यस्थितीतील कारभार पाहता दिसून येत आहे. मुर्तिजापूर रेल्वे स्टेशनवरून दररोज हजारो प्रवासी प्रवास करतात. प्रवाशांना सुरक्षा देणे व गुन्हेगारांवर वचक ठेवूण प्रवाशांच्या किमती वस्तू व इतर साहीत्य चोरी जाणार नाही आणि प्रवाषांना त्रास न होता रेल्वे पोलिसांमुळे त्यांच्या मनात सुरक्षेची भावना निर्माण होणे गरजेचे असतांना रेल्वे प्रशासनाला मात्र मुर्तिजापूर रेल्वे पोलीस चौकीत फक्त दोघे कार्यरत असून इतर पदे रिक्त ठेवण्यामागील उददेश काय ?असा प्रश्न  प्रवाशी वर्गात उपस्थित केला जात असून वाढलेल्या गुन्हेगारीमूळे चिंता व्यक्त केली जात आहे. मुर्तिजापूर रेल्वे पोलिसांची हदद अकोला येथे जाताना बोरगांव  रेल्वे स्टेशन आउटर पर्यंत तसेच अमरावतीकडे जाताना कुरूम रेल्वे स्टेशन आउटर पर्यंत म्हणजेच जवळपास दोन्ही बाजूला 25 किलोमीटर पर्यंत हद आहे. आणखी विशेष बाब म्हणजे मुर्तिजापूर रेल्वे स्टेशन जंक्षन असून येथून परतवाडा आणि यवतमाळ पर्यंत नॅरोगेज शकुंतला येथून धावते. मुर्तिजापूर रेल्वे पोलिसांची हद त्यामुळे परतवाडा आणि दुसरीकडे यवतमाळपर्यंत आहे. मुर्तिजापूर येथून परतवाडा जवळपास 90 किलोमिटर असून यवतमाळ 110 किलोमिटर आहे. यावरून या पोलीस चौकीचे   कार्यक्षेत्र व  महत्व किती आहे हे कोणालाही कळून येवू शकते. परंतू रेल्वे पोलीस
अधिकारी यांना याचे महत्व कळत नसावे काय  असा प्रष्न देखील उपस्थित होत आहे. मुर्तिजापूर रेल्वे स्थानक जंक्शन असून या  रेल्वे स्थानकाला रेल्वे प्रशासन , लोकप्रतिनीधी यांनी  वाळीत टाकल्याप्रमाणे अवस्था झाली आहे. ऐतिहासीक शकुंतला नेरोगेजचा विकास करून सदर मार्ग पर्यटन मार्ग अद्याप पर्यंत होणे गरजेचे होते. परंतु दुरदृश्टीचा अभाव आणि महान वैराग्यमुर्ति संत गाडगे बाबा यांची कर्मभूमी असलेल्या मुर्तिजापूर येथील रेल्वे स्थानकाला सावत्र पणाची वागणूकच देण्यात आली आहे. ऐकीकडे गुन्हेगारीचा ग्राफ वाढत असतांना या चैकीतील कर्मचा-यांची संख्या कमी करणे कशाचे लक्षण आहे. पूर्वी गाडयांची संख्या आणि प्रवाशांची संख्या कमी होती दुसरीकडे गुन्हेगारांवर पोलीसांचा वचक होता. त्यामुळे प्रवाशांना कुठलाही त्रास होत नव्हता. सध्यस्थितीत गाडयांची संख्या वाढली असून रेल्वे प्लटफार्मची लांबी देखील चांगलीच वाढली आहे. त्यामुळे मुर्तिजापूर रेल्वे पोलीस चौकीत   महिला पोलीससह मंजुर पदांपेक्षा जास्त पदे असणे गरजेचे झाले आहे. या गंभीर प्रकाराकडे वरिश्ठ अधिका-यांनी तात्काळ लक्ष देणे गरजेचे आहे.


(मुर्तिजापूर रेल्वे चौकीत पदे रिक्त असून याबाबत वरिश्ठाना कळविले आहे. लवकरच सदर पदे भरण्यात येतील. रेल्वेतील गुन्हेगारीकडे आम्ही प्राधन्याने लक्ष ठेवून आहोत.प्रवषांच्या सुरक्षीततेला सर्वतोपरी प्राधान्य देण्यात येत आहे.)
                                  श्री खारोडे
                प्रभारी ठाणेदार मुर्तिजापूर रेल्वे पोलिस चैकी


SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post