मुर्तिजापूर ( प्रतिनिधी) येथील गझलदीप प्रतिष्ठानच्या वतीने दि.8 एप्रिल 2018 (रविवार )ला सायंकाळी 6:00 वाजता स्थानिक राधामंगलम् मंगल कार्यालयात उ.रा.गिरी गझल पुरस्कार वितरण सोहळा व बहारदार मराठी गझल मुशायरा आयोजित करण्यात आला आहे.सुरूवातीला आंतरराष्ट्रीय ख्यातीचे मराठी गझलगायक भिमरावजी पांचाळे यांचे हस्ते पुरस्कार वितरण संपन्न होणार आहे.यावेळी मा.राहूल तायडे(तहसिलदार),प्रा.डाॅ.चिंतामण कांबळे, प्रा.डाॅ.गोपाल उपाध्ये,डाॅ.जगदीश वानखडे यांची प्रमुख उपस्थिती असेल.त्यानंतर लगेच बहारदार मराठी गझल मुशाय-यामध्ये महाराष्ट्रातील नामवंत गझलकार आपल्या गझल सादर करतील.ज्यामध्ये प्रा.डाॅ.सिद्धार्थ भगत (यवतमाळ), नितीन देशमुख (चांदूर बाजार) गौरवकुमार आठवले ( नाशिक),आबेद शेख (उमरखेड),रमेश आराख (बुलढाणा),किरणकुमार मडावी (मोहदा),अमोल शिरसाट(अकोला), गणेश नागवडे,विजय वडवेराव (पुणे),सुप्रिया जाधव (नाशिक),निर्मला सोनी,प्रफुल्ल भुजाडे (अमरावती), मंगेश गजभिये,मिलिंद हिवराळे (बार्शिटाकळी), संदीप वाकोडे,रवींद्र जवादे,बाळू बेलखेडे,मिलिंद इंगळे (मुर्तिजापूर) सहभागी होतील.या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सुप्रसिद्ध गझलकार गोपाल मापारी व सुनील डोंगरदिवे करतील.मुर्तिजापूर येथील साहित्य रसिकांनी या कार्यक्रमाला बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन गझलदीप प्रतिष्ठान च्या वतीने प्रमोद राजंदेकर,विलास वानखडे,प्रमोद पंत ,शैलेश गिरी,ऋषिकेश बोबडे,दिलीप सरदार,कैलास सोळंके,विनोद महल्ले,सुनिल ढोकणे,योगिता वानखडे,सुनिता इंगळे, निलिमा आष्टिकर, प्रा.नारायण राऊत यांनी केले आहे.
Author: Moeez Shaikh
Related Posts
Some simillar article from this label, you might also like
- Blog Comments
- Facebook Comments
Subscribe to:
Post Comments (Atom)