प्रवीण वैष्णव
तेल्हारा दि. स्थानिक विश्राम गृह येथे युवासेनेचे जिल्हा प्रमुख विठ्ठल सरप पाटील यांनी युवासेनेच्या आयोजित बैठकी मध्ये युवासेना तेल्हारा शहर कार्यकारिणी जाहीर केली.
विश्राम गृह तेल्हारा येथे शिवसेना तालुका प्रमुख विजय मोहोड यांच्या अध्यक्षते खाली युवासेना तालुका व शहराची बैठक घेण्यात आली . यावेळी युवासेना जिल्हा प्रमुख विठ्ठल सरप पाटील यांनी युवासेना तेल्हारा शहर कार्यकारिणी जाहीर केली यामध्ये युवासेना शहर प्रमुख सचिन थाटे,शहर समनवयक राम वाकोडे,शहर संघटक स्वप्नील सुरे ,शहर प्रसिद्धी प्रमुख विशाल नांदोकर,शहर सरचिटणीस किशोर डांबरे, शहर चिटणीस सुरज देशमुख, उपशहर प्रमुख प्रज्वल मोहोड,उपशहर प्रमुख राहुल पुदाखे,उपशहर प्रमुख सागर इंगळे, उपशहर प्रमुख गौरव धुळे, महाविद्यालय प्रमुख वैभव देशमुख , उपशहर संघटक सुरज काईगे,उपशहर संघटक अमित घोडेस्वार ,उपशहर संघटक दिनेश छागांनी,उपशहर संघटक गोविंद फुलवंदे,उपशहर संघटक वैभव कुचके,उपशहर संघटक आकाश पवार युवासेना व्यापारी सेने प्रमुख रोहित अग्रवाल.यांचा समावेश आहे
आयोजित बैठकीला माजी नगर सेवक रामभाऊ फाटकर संतोष राठी,अजय गावंडे, अमर ठाकूर शिवसेना उपशहर प्रमुख ,युवासेना तालुका प्रमुख जयवंत चिकटे, तालुका संघटक बंटी राऊत ,आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयवंत चिकटे यांनी केले तर प्रस्थाविक युवासेना शहर प्रमुख सचिन थाटे यांनी केले.त्यावेळी जिल्हा प्रमुख विठ्ठल सरप यांनी युवसेनेच्या युवसैनिकांनी रचनात्मक कार्य करून समाज सेवा करावी असे सांगितले युवासेना ही भविष्यातील शिवसेना असल्यामुळे युवकांनी सक्रिय राहून कार्य करावे असे विजय मोहोड यांनी सांगितले
व आगामी सर्व निवडणुकरिता बूथ वरची लढाई यशस्वी पणे लढण्या करीता युवसेने च्या कार्यकर्त्यांनी नियोजन बद्ध रणनीती आखावी असे रामभाऊ फाटकर यांनी सांगितले यावेळी तेल्हारा तालुका व शहरातील युवासेनेचे पदाधिकारी व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
