यवतमाळ (प्रतिनिधि मक़सूद अली)
यवतमाळ शहराला पाणी टंचाईचे चटके सोसावे लागत आहे, त्यामुळे नागरीकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागते आहे. एक माणुसकीचा हात म्हणून नगरसेवक जावेद अन्सारी यांच्या पुढाकारातून पिण्याच्या पाणी वाटपाला टँकरद्वारे सुरूवात करण्यात आली, शहरात बहुतांश टँकरद्वारे केवळ वापराच्या पाण्याचा पुरवठा सुरू आहे. वास्तविक खरी गरज नागरीकांना पिण्याच्या पाण्याची आहे, ही बाब लक्षात घेवून नगरसेवक जावेद अन्सारी यांनी पिण्याचे पाणी स्वखर्चाने टँकरद्वारे उ पलब्ध करून दिले. पांढरकवडा मार्गावरील कोहीनुर चौकातून पाणी वाटपाला सुरूवात झाली, यावेळी माजी मंत्री वसंत पुरके,, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल ठाकरे यांचे हस्ते पाणी वाटपाचा शुभारंभ करण्यात आला, यावेळी शब्बीर खान, जुल्फेखार अहेमद, जोवद अख्तर, मो.फारूख, अस्लम खान, अहेमद शहा, मो.शकील आदी उपस्थित होते.
