प्रवीण वैष्णव
तेल्हारा ता.प्रतिनिधी :- तेल्हारा येथील तुकाराम चौकाला लागुण असलेले जागृत पिम्पलेश्वर हनुमान मंदिर काही दिवसा अगोदर न.प.ने अतिक्रमन मधे येत असलेल्या काही मंदिरावर गजराज चलावला होता या मधे तुकाराम चौक येथील पिम्पलेश्वर हनुमान मंदिराचे अतिक्रमण काढण्यात आले होते.मंदिरा मधे असलेली हनुमंताची मूर्ती हे काही शहरातील नागरिक वारी येथील डोहात विसर्जीत करण्या करिता नेन्यास तयारित असताना विजय महाराज अंभोरे यांनी व त्यांच्या सहकार्यानी ती मूर्ती काही दिवस गजनान नगर येथील लाल मारुती मंदिरात ठेवण्यात आली होती. नंतर विजय महाराज यांनी यश नगर येथे मंदिराचे जीर्णोद्धार करुण पिम्पलेश्वर हनुमानजीची मूर्ती तेथून घेऊन हनुमंताच्या मूर्तिचे विधिवत प्राणप्रतिष्ठा करुण मूर्तिची स्थापना स्वतः केली यावेळी तेथे मोठ्या संखेने भाविक भक्त उपस्थित होते .
