न प प्रशासनाचा मनमानी कारभार,हजारो लिटर पाणी ठेकेदारांच्या घशात



प्रवीण वैष्णव
तेल्हारा प्रतिनिधी:-तेल्हारा नगर परिषदेने काही दिवसाअगोदर घेतलेल्या निर्णयानुसार कोणत्याहि ठेकेदारास न प च्या  बोअर मशिन चे पाणी देऊ नये असे ठरविण्यात आले होते.परंतु, न प मधील काही कर्मचारी सत्ता
धिकाऱ्यांच्या पाठीमागे ठेकेदारास त्यांच्या टँकर मध्ये पाणी भरून देत आहेत
     गेल्या काही दिवसापासून तेल्हारा येथे सुरु असलेला पाण्याचा गोरखधंदा नेमका कोणत्या कर्मचाऱयाच्या सांगण्यावरून सुरु आहे असा सवाल नागरिकांच्या मनात सुरु आहे.तेल्हारा येथील स्मशान भूमी येथून हजारो लिटर पाणी टँकर द्वारे नेमयात येत आहे,ज्याची कुठलीही रीतसर पंरवानगी नगर परिषद मधून घेतल्या जात नाही.मुळात मागील काही दिवसांपासुन न प ने अधिकृतरित्या पावती फडणेच बंद केलेले असल्यामुळे स्मशान भूमी येथून टँकर कोणाच्या समर्थनाने पुरविले जातात ,तसेच या अधिकायांवर न प प्रशासन द्वारे कुठलीही कारवाई का केल्या जात नाही असा सवाल नागरिकांच्या मनात उदभवत आहेत

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post