राजकारणी




साव कोणता कोण सोवळा कळू लागले राजकारणी
मुक्या बापड्या जनतेला बघ छळू लागले राजकारणी

बदल कोणता नाही झाला सुपातले ते जुनेच दाणे
जात्यावरती पुन्हा नव्याने
दळू लागले राजकारणी

सत्ता आली नूर बदलला भ्रष्टाचारी नवे जन्मले
मळलेल्या मग शोधत वाटा पळू लागले राजकारणी

लाख वल्गना करून झाल्या वा-यावरती विरून गेल्या
दिले घेतले वचन विसरले ढळू लागले राजकारणी

घडले सारे अनपेक्षित पण तेच पुरेसे  कारण झाले
विरोधकांच्या प्रगती वरती जळू लागले राजकारणी

बंड माजले थंड जाहले परत चालले ते रामायण
कडबोळ्याचे नवे पीठ मग मळू लागले राजकारणी

तुकाराम पाटील
पिंपरी पुणे१७

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post