युवासेना घेणार निशुल्क नीट, सीईटी सराव परीक्षा




  •  विद्यार्थ्यांना ऑनलाईन नोंदणीचे आवाहन , 
  • युवा सेना जिल्हा प्रमुख विठ्ठल सरप पाटील यांचे विद्यार्थ्यांना आवाहन


अकोला/प्रतिनिधी : ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थाना शैक्षणिक अभ्यासक्रकाकरिता विविध टेस्ट द्याव्या लागतात. त्यांना या अडचणीचा सामना मोठ्या प्रमाणात क्रावा लागत असून यामुळे त्यांची तारांबळ उडते. याकरिता युवासेनेच्यावतिने निट सिईटी सराव परिक्षेचे मोफत आयोजन करण्यात आले आहे.
युवा सेना प्रमुख तथा शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून इयत्ता बारावीच्या  ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यासाठी युवासेना पुरस्कृत मॉक टेस्ट 2018 मेडिकल, इंजिनिअरींग, लॉ, फार्मसी या पदवीसाठी शासनाने महाराष्ट्र कॉमन इंटरस टेस्ट (एमएचटिसिटी) अनिवार्य केली आहे. सी.ई.टी, नीट परीक्षा २०१८ च्या पाश्वभूमीवर सराव परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. ही परीक्षा रविवार १५ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता आर.एल.टी सायंस कॉलेज, सिव्हील लाईन, येथे होणार आहे. या सराव परीक्षेत सहभागी होण्यासाठी विध्यार्थ्यानी १२ एप्रिलपूर्वी डब्लू डब्लू डब्लू .वाय एस सी इ टी .कॉम  या संकेत स्थळावर नोंदणी करावी असे आवाहन युवा सेना जिल्हा प्रमुख विठ्ठल सरप पाटील यांनी विद्यार्थ्यांना केले आहे. नुकतीच बारावी परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी निट-युजी, एमएचटी- सिईटी,  इंग्लिश, लॉ, सेट, पेट या कॉमन इंटरस टेस्टच्या सराव परीक्षेत सहभागी होऊ शकतात. या संधीचा लाभ अधिकाधिक विद्यार्थ्यानी घ्यावा तसेच काही अडचण आल्यास युवसेनेच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. असे आवाहन युवासेनेच्या वतीने करण्यात आले आहे. या उपक्रमाकरिता जिल्हाप्रमुंख विठ्ठल सरप पाटील, उपजिल्हाप्रमुखांशी राहुल सुरेश कराळे, अकोला पूर्व राहुल रामभाऊ कराळे अकोट,दीपक बोचरे बाळापुर, सोनू वाटमारे मुर्तिजापुर, योगेश बुंदेले अकोला पच्छिम, व नितिन मिश्रा, जिल्हा समन्वयक कुणाल पिंजरकर, मुकेश निचळ, निखीलसिंह ठाकुर, डॉ.सुनिल आवटे, अश्वीन कपले, जिल्हा सचिव अभिजीत मुळे पाटील,राजेश पाटील कार्तिक गावंडे ,सौरभ  नागोशे तालुका युवाअधिकारी  आस्तीक चव्हाण,तालुका समन्वयक : दत्ता गावंडे, ​बार्शीटाकळी
तालुका युवा अधिकारी: सागर चव्हाण, शहर युवा अधिकारी रवी रिसोडकर, ता. समन्वयक:सनी इंगळे पिंजर, ता.उप तालुका अधिकारी मुकेश हिरणवाडे, मुर्तिजापुर तालुका युवा अधिकारी शेखर मोरे, शहर युवा अधिकारी देवाशिष भटकर, बाळापुर तालुका युवा अधिकारी महेश मोरे शहर युवा अधिकारी
शाम बहुरुपे, पातुर तालुका युवा अधिकारी
अक्षय टाले  ता. समन्वयक सचिन तायडे,
शहर युवा अधिकारी योगेश फुलारी, अकोट तालुका युवा अधिकारी अजय लेलेकर,
ता.समन्वयक कुणाल कुलट, शहर युवा अधिकारी महादेव अवनकार,
तेल्हारा तालुका युवा अधिकारी जयवंत चिकटे
समन्वयक प्रदिप राऊत, शहर युवा अधिकारी
सचिन थाटे विक्की बावरी, अक्षय वानखड़े आदी पुढाकार घेत आहेत.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post