जून 2018 पासून शाळा चालू असेपर्यंत गणवेश आणि शालेय साहित्य देणार गजाननलीला ट्रस्ट-चे काका जाधव.



इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग येथील हे आहे मरगम्मा वस्तीत जवळपास 25 घरे असलेली या भागात शाळा आहे.येथील 180 लोकसंख्या आहे.
यांच्यामध्ये शिक्षणाची गोडी निर्माण होऊन यांनाही शिक्षण भेटावे या उद्देशाने येथे पालावरची शाळा भरवली जात आहे.
या परिवारामधील पुरुष वराह पालन करतात तर स्त्रिया सुया,पिना विकून आपले उदरनिर्वाह  भागवतात व लहान लहान मुले हि दररोज सकाळी भिक्षा मागण्यांसाठी हातात ताट घेऊन बाहेरच फिरत असतात,त्यातून वेळात वेळ काढून शिक्षण घेण्याच्या गोडीला लागलेली पाहायला भेटतात,याचा पूर्ण श्रेय येथील शिक्षिकेला जातो,जी जिद्दीने घरोघरी जाऊन शिक्षणाचे महत्त्व सांगून पालकांची उदासीनता दूर करून पाल्यांना शाळेला पाठवा अशी विनंती करीत असताना पाहायला भेटते.


वर्षातील बारा महिने इथे शाळा भारविण्याचा आटोकाट प्रयत्न केला जातो,केवळ यांना शिक्षित, अक्षरांची ओळख कारण्यहेतू...वर्षा सोमवसे,हि शिक्षिका या पालावरच्या शाळेतील मुलांना अक्षरांची ओळख करून देण्याचा आटोकाट प्रेयत्न करीत असलेली दिसून येते,तर शेखर पाटील,हे समन्वयक म्हणून कार्य पाहतात,मीरा मोटे ह्या गटप्रमुख म्हणून कार्य पाहतात.
या पालावरच्या शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम घेण्यात आले.या कार्यक्रमात श्री गजाननलीला चॅरिटेबल ट्रस्ट नेरुळ नवी मुंबई चे काका जाधव यांनी जून मध्ये सर्व विद्यार्थ्यांना मोफत शाळेचे युनिफॉर्म आणि शालेय साहित्य देण्याचे आश्वासन यावेळी दिले.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post