- हायटेंशन लाईन टावरग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी लवकरच मंत्र्यालयात बैठक.
- युवासेनेचा पुढाकाराने शेतकऱ्यांचा प्रश्नांची शासनाने घेतली दखल.
- भाकर बांधुन आलेल्या शेतकऱ्यांना पालकमंत्र्यांनी दिला दिलासा.
अकोला - हायटेंशन लाईन टॉवरग्रस्त बाळापूर तालुक्यातील वाडेगाव येथील शेतकऱ्यांनी न्याय मिळण्यासाठी सोमवारी सकाळीच भाकरी बांधुन जिल्हाधिकारी कार्यालयातील पालकमंत्री यांच्या जनता दरबारात धाव घेतली.दरम्यान पालकमंत्री ना.डॉ.रणजीत पाटील यांना ही माहिती मिळताच त्यांनी शेतकऱ्यांच्या जवळ जाऊन त्यांचे म्हणने एकुण घेतले व यासंदर्भात लवकरच मंत्रालयात बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्यात येईल अशी ग्वाही दिली. दरम्यान युवासेनेचे जिल्हाप्रमुख विठ्ठल सरप पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी विविध मागण्यांचे एक लेखी पालकमंत्री यांाना देण्यात आले.ादनंतर शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात शांततेत सोबत आणलेल्या झुनका भाकरीचार आस्वाद घेतला. शेतकऱ्यांचे दोन प्रतिनिधी व युवासेनेचे जिल्हा प्रमुख विठ्ठल सरप पाटील यांच्या उपस्थितीत उर्जामंत्र्यांच्या दालनात यासंदर्भातील बैठक पार पडणार आहे.
महाराष्ट्र इंस्तर्ण ग्रीड पॉवर ट्रान्समिशन कंपनी ली.औरंगाबाद या कंपनीने टाकलेल्या टावरमुळे व हायटेन्शन लाईनमुळे शेतीचे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सदर टावरमुळे व हायटेन्शन लाईनमुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले असून हाय टेन्शन लाईन मुळे भविष्यात सुद्धा नापिकी होण्याची शक्यता आहे. तसेच जीवित्याच्या धोक्या मुळे मजूर हाय टेन्शन लाईन टावर मुळे शेतीचे नुकसान,शेतकऱ्यांना जागेचा मोबदला द्या. मजुर सुद्धा काम करण्यास तयार नाही. तसेच फलधारणा व पिक या वर सुद्द्धा परिणाम झाला आहे. तसेच ट्रकटर व इतर लोखंडी अवजाराने ओलाव्यात काम केले असता अर्थिंग सुद्धा लागत असल्याचे जाणवत आहे.
व विद्युत लहरीचा परिणाम सुद्धा होत आहे. आमच्या अज्ञान पानाचा फायदा घेऊन सदर कंपनीने अल्प मदत देऊन आमची फसवणूक केली.
टावर मुळे व हाय टेन्शन लाईन मुळे शेतीचे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सदर टावरमुळे व हायटेन्शन लाईन मुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले असून आमच्या कुटुंबाची विस्कळीत झाली आहे.
३१ मे २०१७ रोजीच्या शासकीय परिपत्रका नुसार व आम्हाला मिळणाऱ्या पिकाच्या वार्षिक उत्पनाची मर्यादा निश्चित करून त्या प्रमाणात सदर कंपनी कडून कायम स्वरुपाची रक्कम सुद्धा देण्यात यावी अशी मागणी करत युवा सेना जिल्हा प्रमुख विठ्ठल सरप पाटील यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी यापुर्वीच निवेदन दिले आहे.यामागण्यांसदर्भात पालकमंत्री डॉ.पाटील यांनी शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या एैकुण घेतल्या.आणि यावर लवकरच मार्ग काढण्यात येईल असे यावेळी सांगीतले. या वेळी शेतकरी दीपक सरप, किसन गव्हाळे, जानराव अंभोरे, गंगाधर सरप, कोकिला सरप, अरुण अंभोरे, दिनेश गवई, रामभाऊ कळंब, गोविंदराव घाटोळ, प्रल्हाद भटकर, गुलाम जाफर, गुलाम हुसेन, गुलाम जाकीर,गुलाम मोईन,अरुण मसने,वासुदेव सरप,श्रीराम हाडोळे, मंगेश धनोकार,
केशव नावकार, ज्ञानदेव डोंगरे, शेख शब्बीर, शेख करीम, तोताराम धर्माळे, महेबूब खान, विलास मानकर, जानराव अंभोरे, अरुण अंभोरे, दिनेश गवई, किसण गव्हाळे, पुंडलिक पुंडकर, गजानन जुमळे, नितीन सरप,नारायण उमाळे, कमलाबाई खोडके, रामकृष्ण सरप, आशाबाई सरप, वासुदेव सरप,शेख मुस्तफा, प्रकाश खंडारे, महेंद्र मंगलकर, गोकर्णाबाई ढोरे,शेख सादिक,तोताराम धर्माळे,दुर्गाबाई भटकर, संजय कातखेडे,सरस्वती वाडकर, गुलाबराव जंजाळ, चंद्रभान डोंगरे,नारायण भूम्बरे, सुनंदा भूम्बरे, वैभव धर्माळे आदी शेतकऱ्र्यांनी स्वाक्षरी करून निवेदन दिले. यावेळी युवासेनेचे शहरप्रमुख नितीन मिश्रा,जिल्हा समन्वयक निखील ठाकुर,सागर चव्हाण,आकाश बोराळे,रणजीत गावंडे,प्रतिक देशमुख,सौरभ नागोशे आदींची उपस्थिती होती.



