लोहारा शहरातील महात्मा बसवेश्वर यांच्या जंयती उत्सव अध्यक्षपदी मंगेश बनशेट्टी तर उपाध्यक्षपदी गणेश पालके यांची निवड करण्यात आली आहे



इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- लोहारा शहरातील महात्मा बसवेश्वर यांच्या जंयती उत्सव अध्यक्षपदी मंगेश बनशेट्टी तर उपाध्यक्षपदी गणेश पालके यांची निवड करण्यात आली आहे. या जयंती उत्सव मंडळाची बैठक महात्मा बस्वेश्वर मंदिरात शिवानंद स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली दि.1 एप्रिल घेण्यात आली.या बैठकीत सर्वानुमते कार्यकारणी निवडण्यात आली.अध्यक्षपदी मंगेश  बनशेट्टी,उपाध्यक्षपदी गणेश पालके,सचिवपदी बाळु (परमेश्वर)माशाळकर,सहसचिवपदी गणेश कमलापुरे,प्रसिध्दी प्रमुख संतोष फावडे,सहदेव काडगावे,मिरवणुक प्रमुख शिवानंद स्वामी,हरी लोखंडे,प्रविण संगशेट्टी,महेश कुंभार,रामेश्वर कुंभार,यांची या बैठकीत सर्वानुमते निवड करण्यात आली या बैठकीस विर (सर) फावडे,सागर स्वामी,कपिल माशाळकर,सचिन तोडकरी,प्रकाश तोडकरी,सुनिल ठेले,तम्मां स्वामी,पिंटु कमलापुरे,यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post