झरी येथे दोन दिवसीय आदिवासी जनजागृती कार्यशाळा



रफीक कनोजे झरी : - झरी येथे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ व शिवरामजी मोघे महाविद्यालय पांढरकवडा यांच्या सयूंक्त विद्यमाने आदिवासी जनजागृती कार्यशाळा (ता. २९ व ३०) ला पंचायत समीती च्या सभागृहात  घेण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवरामजी मोघे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ शंकर वऱ्हाटे होते. कार्यशाळेचे उदघाटन कुलगुरू डॉ मुरलीधर चांदेकर यांच्या हस्ते पार पडले. यावेळी राजेश मिरगे संचालक रा से यो समनवयक , प्रा नरेश महाजन , प्राचार्य डॉ अजय गुल्हाने , मिराताई फडणवीस , खरबडाचे सरपंच पुनाजी कुळमेथे, गटविकास अधिकारी शुभाष चव्हाण , सहाय्यक गटविकास अधिकारी शिवाजी गवई हजर होते.
शिवाजी गवई यांनी आपल्या भाषणातून या कार्यशाळेमागचा उद्देश, यासाठी झरी ची निवड का करण्यात आली, येथील आदिवासी बांधवांच्या व भगिनींच्या व किशोर वयीन मुलींच्या समस्या , कुमारी मातांचे प्रश्न , शासनाच्या विविध योजना व येथील परिस्थिती व वास्तविकता जाणून घेणे त्यासाठी केवळ कार्यक्रम म्हणून नाही तर हा उपक्रम म्हणून राबवावा व मनापासून राबविणे गरजेचे असल्याचे सांगितले.
झरीत कुलगुरूंची ही पहिलीच वेळ होती त्यांनी भाषणातून प्रत्येक विध्यार्थी व समाजातील व्यक्तीची जबाबदारी आहे की आपण समाजाला काही देणे आहो ही जाणीव ठेवून आपल्या शिक्षणाचा व पदाचा समाजाला उपयोग होत नसेल तर काय उपयोग. आपण स्वतःला मोठे समजण्या पेक्ष्या समाजाने आपल्याला मोठं समजले पाहिजे. या कार्यशाळेतून नक्कीच काहीतरी साध्य झाले पाहिजे. हा कार्यक्रम न राहता उपक्रम बनला पाहिजे असे त्यांनी सांगितले.
सहाय्यक गटविकास अधिकारी शिवाजी गवई , यांनी तालुक्यातील वस्तुस्थिती , पेसा कायद्याचे अज्ञान , आदिवासींचे हक्क , त्यांच्या सहभागाची वस्तुस्थिती, राजकारण, ग्रामसभा , व कुमारी मातांचे प्रश्न इतर विषयावर सविस्तर मार्गदर्शन करीत  हे  विषय चांगल्या व जबाबदार व्यक्ती कडे सोपविले पाहिजे. जेणेकरून हा कार्यक्रम कागदावर न राहता प्रत्यक्षात उतरला पाहिजे असे सांगितले. अध्यक्षिय भाषणात प्राचार्य  डॉ शंकर वऱ्हाटे यांनी ही कार्यशाला झरी ला घेण्यामागचा महाविध्यालया चा उद्देश सांगून, जखम जिथे असते तिथेच मलमपट्टी लावणे गरजेचे आहे.  झरी तालुक्यातील या समस्या येथे येऊन संबंधितांशी चर्चा व प्रत्यक्ष भेटून सोडविण्यासाठी व खरी परिस्थिती व त्यामागचे मूळ कारणे शोधण्यासाठी झरी ची निवड करण्यात आली. असून वेळोवेळी या समस्यांचा मागोवा रासेयो च्या माध्यमातून घेतली जाईल.  हे काम रासेयो चेच नसून सर्वांचे आहे. यानंतर डॉ गिरीष माने,  डॉ वृषाली  माने यांनी प्रोजेक्टच्या माध्यमातून आरोग्य विषयक समुपदेशन व मार्गदर्शन शिबीर घेतले व दुसऱ्या दिवशी नियोजित विषयावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन महिला व पुरुषांना करण्यात आले. या दोन दिवसीय कार्यशाळेसाठी सकाळी ११ ते ५ दरम्यान परिसरातील अकरा महावीद्यालयाचे विद्यार्थी व विद्यार्थीनी व महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या. ह्या दरम्यान उपस्थीत असनाऱ्याना चहा नास्ता व जेवनाची सुध्दा व्यवस्था करण्यात आली होती. या कार्यक्रमाला प्राचार्य डॉ तेलगोटे, प्राचार्य डॉ जलतारे , प्राचार्य विठ्ठल पाईलवार , प्राचार्य डॉ घरोटे ,व इतर महाविध्यालयाचे प्राचार्य व मोघे महाविद्यालयाचा पूर्ण प्राध्यापक वर्ग या निवासी शिबिरा साठी उपस्थित होते , व समारोपीय कार्यक्रम अमरावती विध्यापिठाचे कुलसचिव डा अजय देशमुख यानी केले.
दोन दिवसीय कार्यशाळेत कुमारी मातावर सुद्धा चर्चा करुन मते व्यक्त करण्यात आली. त्यांच्या समस्या कार्यशाळेत भाषणे देउन सुटत नाही. झरी तालुक्यात शंभर च्या वर कुमारी माता असुन शेतकरी आत्महत्या पेक्षाही कुमारी मातांचा प्रश्न गंभीर असुन ह्याकडे शासनाचे संपूर्णता दुर्लक्ष आहे. दोन वर्षापुर्वी आदिवासी प्रकल्प विकास पांढरकवडा यांच्या मार्फत रमाई बहुउद्देशीय संस्था पांढरकवडाच्या अध्यक्षा अनीता जांभूळकर यानी १३० कुमारी माता व विधवाना शिलाई मशीन प्रशीक्षण दिले. त्यानंतर १३० शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले. त्यापैकी शंभरच्या वर कुमारी माताना शिलाई मशिन वाटन्यात आल्या. त्यांनी सतत कुमारी मातांच्या समस्येविषयी निवेदन व प्रस्ताव शासनाकडे पाठवुन पाठपुरावा केला आहे. जांभुळकरनी  शासनाला  सुचविलेल्या कुमारी मातांना रोजगार व त्यांचे पुनर्वसनासाठी च्या योजना कागदावरच शासन दरबारी धुळखात आहे. कुमारी मातांच्या समस्या, उपाय योजना व प्रशीक्षणा ची जबाबदारी अनीता जांभूडकर  कडे सोपविली पाहिजे. असे मत कुमारी मातांचे आहे. कुमारी मातांच्या प्रश्नाकडे प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post