सैय्यद मुजीबोद्दीन
पुसद: दिनांक १ अप्रैल इस्लाम धर्मामध्ये इब्राहिम अलैह सलामची सुन्नत जोपन्यासाठी हजारो वर्षा पासून मुस्लिम समाजात लहान मुलांची सुनता करण्याची धार्मिक परंपरा कायम आहे। या धार्मिक सुन्नत परंपरेला जोपन्यासाठी तसेच मुलामध्ये विविध प्रकारचे रोगमुक्त राहण्या साठी यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथे दरवर्षी प्रमाणे या वार्षिहि मोफत सुनता शिबीराचे आयोजन करण्यात आले होते त्यात २४२ गरीब व गरजु लोकांनी अपले मुलांची यशस्वी सुनता करुण घेतली। पुसद येथील जेष्ठ समाज सेवक सैय्यद मुजीबोद्दीन यांनी २५ मे २००८ ला प्रथम मोफत सुनता शिबीर घेण्याची सुरुवात केली होती। त्याच अनुषंगाने गेल्या १० वर्षापासून सतत मुफ्त सुनता शिबिर घेण्याची परंपरा कायम असून येथील आला हजरत कमेटी चे तरुण युवक शिबिर घेण्याचे १५ दिवस अगोदर पासून जंगलातून निम्बा झाडचे छाल आणून त्याचा पावडर तयार करुण तसेच शिबिर साठी लागनारी सर्व सामाग्रिह उपलब्ध करुण दिनांक ३१ मार्च रोजी सकाळी ९ वाजे पासून ५ वाजे पर्यंत येथील मस्जिद वार्डlतील उर्दू हायस्कूलचे मैदानात मुफ्त सुनता शिबीराचे आयोजन केले होते। सदर शिबीरात पुसद तसेच परिसरातील अनेक गावांचे एकुन २४२ मुलांची सुनता करण्यात आली असून सुनता झालेल्या मुलांना सैय्यद इस्तियाक भाई, कय्यूम भाई व शेरखान यांचे हस्ते पौष्टिक आहार वाटप करण्यात आले तर आयोजक कमेटी चे सैय्यद ज़ाकिर अली, करामत खान व इतर यांचे हस्ते ओषधीचे मोफत वाटप करण्यात आले। तसेच सुनतासाठी बाहेरगांववरुन आलेल्या मुलांना व त्यांचे नातेवाईकांना कमेटी तर्फे भोजनाचीही व्यवस्था देखील करण्यात आली होती या शिबिरासाठी पुसद येथील नामकिंत डॉ.इर्शाद व दिग्रस येथील अनुभवी सुनताकार मोहम्मद फारूक यांनी सहकार्य करून एकुन दोनशे बेचाळीस मुलांची यशस्वी सुनता केली.
सदर शिबिरात शासकीय उपजिल्हा रुग्णालय पुसद चे डॉ. सैय्यद इमरान यांनी शिबिरात आलेले मुलांचे आरोगयाची तपासणी केली. तर हाजी सैय्यद रियासत अली, डॉ. अकील मेमन, डॉ. वजाहत मिर्झा यांनी प्रत्येक कमात सहकार्य केले तसेच सुनताकार मोहम्मद फारूक यांना शिबिर चे आयोजक सैय्यद ज़हीरोद्दीन, शेरखान ठेकेदार, सैय्यद मुजीबोद्दीन व उस्मान ठेकेदार यांचे हस्ते रोख रक्कम भेट देवून सत्कार करण्यात आला. शिबीराचे यशस्विसाठी आला हजरत कमेटीचे मुख्य सैय्यद ज़ाहिरोद्दीन, सैय्यद ज़ाकिर अली, सैय्यद मुजीबोद्दीन, उस्मान ठेकेदार, शेर खान ठेकेदार, हसन अली, अब्दुल वाजीद, करामत खान, इरफ़ान खान,सोनू, फुरकान, सैय्यद मुख्तार, नदीम बेग, सैय्यद अकरम, शादाब खान, सैय्यद रेहान, दानिश खान, तहसीन खान, शेख मुज़म्मिल, सैय्यद जुनेद, अब्दुल साबिर, साकिब शाह नगर सेवक इत्यादि यांनी अथक परिक्षम घेतले.

