माणुस माणुसकीला मारतांना बघतो आहे



माणुस माणुसकीला 

मारतांना बघतो आहे
हरवला कुढे माणसातला माणुस 
ते माणुसपण शोधतो आहे

घायाळ होतात रोज
  कळ्या कितीतरी
दोष तिचा काय म्हणावां
अवघड झाले तिला तिचे फुलायचे
उमलण्याधी ती तुटते आहे

घडले ते खरे म्हणावें की खोटे
जो तो विचारतो आहे
मुक्या झाल्यात वेदना
 घाव सोसुनही घात तो
कसा झला 
पुराव शोधतो आहे

कोण म्हणे तो वार होता 
खरचं का तो अत्याचार होता
घाव दिला कोणी 
जखमा विचारता आहे
तोडं काळे करूनही 
ते..
र्निदोष सुटता आहे

देव तेव्हां नव्हता म्हणे देव्हाऱ्यात
मग दरबान मंदिरातले कुठे होते
आता कशा जपुन ठेवाव्यातं 
या लेकी
हात जुडतात तिथेही 
पावित्र्य भंगते आहे.

मोजु नये आता 
न्याय अंन्याय तराजूत
सोडुन डोळ्यावरची पट्टी
शिक्षा एकचं आता राहीली आहे
भरचौकात नेऊन दाखवावां
बघं माणुस कसा अमाणुष 
जळतो आह
  • संजय धनगव्हाळ

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post