सृजन साहित्य संघाची मासिक काव्यमैफल संपन्न



मूर्तिजापूर-येथील सृजन साहित्य संघ, मूर्तिजापूर व्दारा आयोजित मासिक काव्यमैफल कवी  प्रमोद पंत, गोयनका नगर, मूर्तिजापूर यांच्याकडे उत्साहात संपन्न झाली. काव्यमैफलीच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कवी रामकृष्ण आसरे हे होते.अध्यक्ष तथा उपस्थित कविंचे स्वागत कवी प्रमोद पंत यांनी आपला अलीकडेच प्रकाशित 'प्रश्नांच्या हतबल देठासी' हा काव्यसंग्रह भेट देवून केले. प्रास्ताविक  रवींद्र जवादे यांनी केले. उपस्थित कविंनी बहारदार रचना सादर करुन मैफलीत रंगत भरली. यांत कवी रवींद्र जवादे, रामकृष्ण आसरे, प्रमोद पंत, सौ. सुनिता इंगळे, शैलेश गिरी ,सुनिल ढोकणे, बाळूभाऊ बेलखेडे, सौ. निलीमा आष्टीकर, विनोद महल्ले, भड सर, मिलींद इंगळे, सौ.योगिता वानखडे, प्रशांत पंत,विष्णु लोडम यांनी सादरीकरण केले. उत्कृष्ट रचनेसाठी  प्रमोद पंत यांना अध्यक्ष्यांच्या हस्ते भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.संचलन प्रा. प्रशांत पंत यांनी तर आभार प्रदर्शन सौ. संजना पंत यांनी केले.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post