इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- पंचायतराज व्यवस्था निर्माण केल्यामुळे ग्रामविकासाला गती मिळाली आहे.देशात स्त्री व पुरुष मिॆळुन सहा लाख जणांना काम करण्याची संधी मिळाली हे पंचायतराज व्यवस्थेचे फलित आहे,असे प्रतिपादन औशाचे आमदार बसवराज पाटील यांनी केले. 73 व्या घटना दुरुस्ती रौफ महोत्सवानिमित्त लोहारा शहरातील सप्तरंग मंगल कार्यालयात दि.24 एफ्रिल रोजी सामाजिक कार्यकर्ते जालिंदर कोकणे व लोहारा तालुका कॉग्रेसच्यावतीने लोहारा,उमरगा तालुक्यातील सरपंचाच्या सत्कार सभारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या प्रसंगी आमदार बस्वराज पाटील बोलत होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष अमोल पाटील होते. यावेळी प्रमुख म्हणुन जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष बापूराव पाटील,रामकृष्ण खरोसेकर,विठलसाई साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सादीकमियां काझी,जिल्हा सहकार बोर्डाचे संचालक अविनाश माळी,तालुका समन्वय समितीचे माजी अध्यक्ष नागण्णा वकील, जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती बाबूराव राठोड,शरणप्पा पत्रिके,प.स.उप सभापती नमिता पाटील,माजी सभापती आसिफ मुल्ला,दिलीप भालेराव,जि.प.माजी सदस्य अँड.दीपक जवळगे, पंचायत समिती सदस्या हेमलता रणखांब,रमेश कोकणे,जयराम कोकणे, उमरगा कॉग्रेस तालुकाध्यक्ष अँड.सुभाष राजोळे,अदि उपस्थित होतेआमदार बस्वराज पाटील पुढे बोलताना म्हणाले की,स्थानिक स्वराज्य संस्थांना पंचायतराजमध्ये आपले सक्षमीकरण आणि लोकशाहीचे विकेंद्रीकरण करण्याची मोठी संधी मिळाली आहे.माजी पंतप्रधान स्व.राजीव गांधी व यशवंतराव चव्हाण यांनी समृध्द भारताचे स्वप्न पाहिले होते.त्यांच्या संकल्पनेतूनच पंचायतराज व्यवस्था निर्माण करण्यात आली.या व्यवस्थेमुळे स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये महिलांना पन्नास टक्के प्रतिनिधीत्व मिळाले आहे.आगामी काळात लोकसभा व विधानसभेतही महिलांना पन्नास टक्के आरक्षण मिळावे,यासाठी काँग्रेस पक्ष पुढाकार घेणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.यावेळी तालुक्यातील सरपंचाचा मान्यवरांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला.यावेळी आसिफ मुल्ला, नागण्णा वकील,अमोल पाटील यांची सविस्तर मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाचे प्रस्ताविक जालिंदर कोकणे व सूत्रसंचालन मुकेश सोनकांबळे यांनी केले. या कार्यक्रमास दत्तात्रय पाटील,गुडप्पा भुजबळ, कॉग्रेस शहराध्यक्ष के.डी.पाटील,दिलीप पाटील,विठ्ठल
पाटील,बालाजी बिदे,युवक कॉग्रेस शहराध्यक्ष हरी लोखंडे,इस्माईल मुल्ला,नगरसेवक आरिफ खाणापुरे, ब्रम्हानंद पाटील,पं.स.सदस्य व्यंकट कोरे,आबासाहेब
साळुंके,जयराम भाऊ कोकणे,सरपंच संगीता माने, बाबासाहेब चव्हाण,शरणप्पा कबाडे,शंकरअण्णा जट्टे,चंद्रशेखर पवार,भरत अण्णा विरुध्दे,अमोल माळी,महादेव टेंगळे, तानाजी माटे,विठ्ठल वचने पाटील,इंद्रजित लोमटे,अँड.विश्वनाथ पत्रिके,दिपक रोडगे,रौफ बागवान,अमोल फरीदाबादकर,यांच्यासह तालुक्यातील सरपंच व पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
