माणुसपणा



माणुसपणा नसावा असेही
माणसाने बदलु नये
नजरेत आपलेपणा नसेल
असेही असु नये

आयुष्यात तिच्या काटेच असतात
जखमा पिचडतील असे वागु नये
न्याय तिला नसला तरी
मेणबत्तीवर उगाच अन्याय 
करु नये

नाते गुतांगुतीचे असले तरी
त्यात माणुसकी असावी
बघण्यात थोडीतरी आपुलकी
दीसावी

आपलेच असतात आपल्या अवती भोवती
मग आपल्यांची भिती का वाटावी
ईतकीही अमाणूषतेची आग
माणसा माणसात नसावी

वनवास तेव्हाही होता सितेला 
आजही वनवासात जगते आहे
तेव्हा एकचं रावण होता
आता कितीतरी रावणाचा अत्याचार भोगते आहे

कधी ती जगलीच नाही आणि
आता कोणी जगु देतचं  नाही
म्हणुन या कलीयुगात रामाला
मदिरात बंदिसत केले आहे
आजही दौप्रदी कौरवाच्या दरबारात श्रिक्रूष्णाला शोधते आहे

संजय धनगव्हाळ

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post