शनिवार ता २१ यवतमाळ (प्रतिनिधि मक़सूद अली)
उन्नाव, कठुआ, रोहतक, सुरत तसेच देशभरातील अनेक महिलांसह बालिकांवर अत्याचाराच्या घटना घडत आहे. या घटनेतील आरोपींवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी घेवून आज, दि. २० एप्रिल रोजी स्थानिक तिरंगा चौकात धरणे आंदोलन केले. यावेळी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला होता.जम्मू काश्मिरमधील कठूआ येथील आठ वर्षीय बालिकेवर अत्याचार करून तिचा निर्घूण खून करण्यात आला. त्याप्रमाणे उत्तरप्रदेशमधील उन्नाव, रोहतक तसेच सुरत येथेही बलात्काराच्या घटना घडल्या आहेत. यावरून कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण केल्या जात आहे. या ठिकाणच्या घटनेतील आरोपींविरोधात जलदगती न्यायालयात प्रकरणाची सुनावणी घ्यावी, आणि त्या नराधमांना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे ह्या घटनेतील आरोपींना पाठीशी घालणाऱ्या संघटनांसह संस्थाविरोधातही कायदेशीर कारवाई करावी, अशीही मागणी निवेदनातून करण्यात आली.
देशातील महापुरूष तसेच धार्मीक स्थळावर जाणीवपूर्वक कृत्य करून दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न चालू आहे. अशा घटनांमुळे देशात अराजकता निर्माण होण्याची शक्यता आहे. या घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी आज, दि. २० एप्रिल रोजी स्थानिक तिरंगा चौकात मौलाना आझाद विचार मंचच्या वीने धरणे आंदोलन करण्यात आले. यामध्ये अध्यक्ष अमन निर्बाण, सुधाकर घायवाण, मेहबूब शहार, अकरम मवाल, शेख जाकीर, युनूस शेख यांच्यासह इतरही नागरिक मोठ्या संख्येने होते. आंदोलनानंतर मौलाना आझाद विचार मंचच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेवून निवेदन सादर केले.

