सराईत गुन्हेगारांना चोरीच्या मुद्देमालसह अटक



 यवतमाळ - (प्रतिनिधि मक़सूद अली) यवतमाळ शहरात पेट्रोलींग करीत असतांना सराईत गुन्हेगार श्याम जागदंड (23), बबलु तायडे (18) दोघेही रा. यवतमाळ यांचेजवळ चोरीचे मोबाईल असल्याची  माहिती मिळाल्याने त्यांचा शोघ घेण्यात आला. त्यांना विचारपुस केली असता अवधुतवाडी परिसरात दोन गुन्हे केल्याची कबुली त्यांनी दिली. यावरुन भादंवि कलम 457, 380 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांचेजवळ रेडमी कंपनीचा 4 हजार रुपये व अन्य एक रेडमी कंपनीचा मोबाईल ज्याची किंमत 5 हजार, तसेच गुन्ह्यातील मोबाईल किंमत 10 हजार रुपये असे एकुण तीन मोबाईल आढळून आले. या दोन्ही आरोपींना  मुद्देमालसह पुढील तपासकरीता अवधुवाडी पोलीसांचे स्वाधीन करण्यात आले. ही कारवाई पोलीस अधिक्षक एम.राजकुमार, अपर पोलीस अधीक्षक अमरसिंह जाधव यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक मुकूंद कुलकर्णी, नितीन पतंगे, भिमराव शिरसाठ, गजानन डोंगरे, सचिन हुमने, यांनी पार पाडली.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post