रिलायंन्स फाऊंडेशने टपाल हेटी गावाची पाणी समस्या मिटविली


कळंब :-कळंब तालुक्यातील टपाल हेटी या गावामध्ये मागील अनेक दिवसापासून तिव्र पाणीटंचाई होती. या अनुषंगाने रिलायंन्स फाऊंडेशन पुरस्कृत जय बजरंग शेतकरी समिती टपालच्या वतीने गावकर्‍यांनी एकत्रीत होऊन रिलायंन्स फाऊंडेशन निधी व लोकवर्गणी व श्रमदानाने गावात घरोघरी पिण्याच्या तसेच दैनदिन वापराच्या पाणी पुरवठ्या साठी नवीन विहीर व पाईप लाईन टाकून योजनेची पुर्तता करुन गावात पाणी पुरवठा सुरळीत केला. या कामाचा लोकार्पण सोहळा दि. 23 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता रिलायंन्स फाऊंडेशचे  बिज प्रतिनिधी संदिप वायळ, व टपाल हेटी गावाचे गावकर्‍यांच्या हा उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला. या कामासाठी वन विभागाने जागा उपलब्ध करुन दिली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजु साठे, अंकुश काकडे, राजु टेकाम, तुकाराम रामपूरे, बळी टेकाम, रामकृष्ण मेश्राम, मधुकर सक्रापूरे, राजु लोणसावळे,संतोष काकडे आदी प्रयत्न शिल होते.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post