लोकसेवा आयोग परिक्षेत मुलांमध्ये अक्षय वातीले तर मुलींमध्ये मयुरी नाले राज्यात प्रथम


    यवतमाळ येथील ज्ञानज्योती परिक्षा केंद्र दारव्हा रोड, यवतमाळ येथील विद्यार्थी एमपीएससी टॅक्स असिस्टंट परिक्षेत अक्षय वातीले हा मागास वर्गीय विद्यार्थ्यांमध्ये महाराष्ट्रातुन पहिला तर एससी प्रवर्गातुन मुलीमध्ये मयुरी नाले यांनी राज्यातुन प्रथम येण्याचा मान पटकाविला आहे. राज्य लोकसभा आयोगाव्दारे घेण्यात येणारे कर सहाय्यक परिक्षा 2017 मध्ये संपुर्ण राज्यात घेण्यात आली. या परिक्षेसाठी संपुर्ण राज्यातुन  बसलेल्या लाखो उमेदवारांमधुन घरची परिस्थिती नसतांना ज्ञानज्योती स्पर्धा परिक्षा केंद्राच्या कमवा आणि शिका योजनेत सहभागी होवुन आपले शिक्षण पुर्ण केलेला अक्षय वातीले व कु. मयुरी नाले यांनी ज्ञानज्योती स्पर्धा परिक्षा केंद्र यवतमाळ मध्ये तज्ञांचे मार्गदर्शन घेवुन हे उज्वल यश संपादन केले. सर्व सामान्य परिवारातुन आलेल्या अशा विद्यार्थ्यांना योग्य ते कौशल्याचे प्रशिक्षण देतांनाच काम देवुन या मुलांना दिवसातील सहा तास काम व उर्वरीत वेळ अभ्यास, क्लास व लायब्ररी उपलब्ध करून देवुन ज्ञानज्योतीने मागील वर्षी कमवा आणि शिका योजनेची सुरूवात केली. सामाजिक बांधिलकी जपत संस्थेनी सुरू केलेली हि योजना विद्यार्थ्यांमध्ये अतिशय लोकप्रिय होत आहे.


    सदर योजनेमध्ये सहभागी होण्याकरीता जुलाई 2018 मध्ये पुन्हा नि:शुल्क प्रवेश प्रक्रिया घेण्यात येणार आहे. यासाठी कुठलीही प्रवेश फि नसुन ज्ञानज्येाती पुणे आणि यवतमाळ या दोन्ही  केंद्रावर हि सुविधा उपलब्ध असून ज्ञानज्योती स्पर्धा परिक्षा केंद्राच्या कमवा व शिका या योजनेत सहभागी होण्याकरीता भ्रमणध्वनी क्रमांक 8605221097 तसेच 9975806127 यावर संपर्क साधण्याचे आवाहन संस्थेच्या संचालकांनी केले आहे. ज्ञानज्योती स्पर्धा परिक्षा अभ्यास केंद्र दारव्हा रोड व रेणुका मंगल कार्यालया जवळ अविरत पणे सुरू आहे.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post